सातारकरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारं चित्र (Udayanraje and shivendraraje) आज पाहायला मिळालं. कारण, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले (Udayanraje and shivendraraje) यांनी एकत्र शक्तीप्रदर्शन केलं.
शिवेंद्रराजे यांनी भाजपकडून सातारा-जावली मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज दाखल केला.
उदयनराजे यांनी भाजपकडून सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीही दोन्ही राजेंच्या समर्थकांकडून विजयी संकल्प रॅली काढण्यात आली.
यावेळी दोन्ही राजे या रॅलीमध्ये एकत्र पाहायला मिळाले. त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.
दोन्ही राजेंनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठा फटका बसला आहे.