Manohar Joshi | मातोश्रीवरून एक आदेश अन् मनोहर जोशींनी सोडलं मुख्यमंत्रीपद.. नेमक काय घडलं ?

| Updated on: Feb 23, 2024 | 8:42 AM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. कट्टर शिवसैनिक असलेले मनोहर जोशी यांची हिंदहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम निष्ठा होती.

Manohar Joshi | मातोश्रीवरून एक आदेश अन् मनोहर जोशींनी सोडलं मुख्यमंत्रीपद.. नेमक काय घडलं ?
Follow us on

मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. हिंदुजा रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. 21 फेब्रुवारी रोजी मनोहर जोशी यांची प्रकृती खालावू लागल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच आज पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कट्टर शिवसैनिक असलेले मनोहर जोशी यांची हिंदहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम निष्ठा होती. शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडलेला एक ज्येष्ठ नेता आज काळाच्या पडद्याआड गेला.

मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या निष्ठेचा किस्सा आजही चर्चेत आहे. ९० च्या दशकात साली राज्यात शिवसेना-भाजपाचं युतीचं सरकार सत्तेवर होतं. त्यावेळचा हा किस्सा आहे.

मातोश्रीवरून एक आदेश अन् मनोहर जोशींनी दिला राजीनामा

हे सुद्धा वाचा

राज्यात पहिल्यांदाच सेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतर मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. 1995 साली शिवाजी पार्क येथील शपथविधीत मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र १९९९ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना एक चिठ्ठी पाठवली आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या मुद्यावरून राजकारण तापलं. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना एक चिठ्ठी पाठवली आणि त्यानंतर मनोहर जोशी यांनी कोणतीही खळखळ न करता, लागलीच राजीनामा दिला. एका चिठ्ठीवर त्यांनी त्यांचं पद सोडून दिलं.

‘ प्रिय मुख्यमंत्री, तुम्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. कृपया त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.  ‘

असा मजकूर त्या पत्रात होता. मातोश्रीवरुन आलेला हा आदेश वाचल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.