Sanjay Raut | प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना उमेदवारी का?; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार काल जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी ( अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले. धक्कादायक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीची तीन वर्ष बाकी आहेत. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबद्दल बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला.

Sanjay Raut | प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना उमेदवारी का?; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 11:53 AM

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी |15 फेब्रुवारी 2024 : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार काल जाहीर करण्यात आली. महायुतीचे घटकपक्ष भाजपने तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) एक असे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. महायुतीमधील भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा गाडगीळ आणि डॉ.अजित गोपचडे यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी ( अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले. धक्कादायक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीची तीन वर्ष बाकी आहेत. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यामुळे विविध चर्चांना सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी का देण्यात आली याबद्दल त्यांनी माध्यमांसमोर भाष्य केले. ‘प्रफुल्ल पटेल यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटातून त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली ‘ असे राऊत म्हणाले. या मुद्यावरून त्यांनी टीकाही केली.

काय म्हणाले संजय राऊत ?

‘प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले या देशांमध्ये आधी असं घडलं नव्हतं.पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटात पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घेतली. अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाने चंद्रकांत हांडोरे यांना क्रॉस वोटिंग केलं. एक दलित चेहऱ्याला मतदान करून त्यांना राज्यसभेवर पाठवणं अत्यंत महत्त्वाचं होतं त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे’ असं राऊत म्हणाले. भाजपकडून निष्ठावांतांना सतरंज्या उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना उमेदवारी द्यायच्या यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजप फुगलेला बेडूक

भाजप हा फुगलेला बेडूक आहे तो कधीच बैल होणार नाही अशी टीका राऊत यांनी केली. जे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत त्यांना तुम्ही वेडे समजत आहात का? असा सवाल राऊत यांनी विचारला. या देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकरी दिल्लीच्या दिशेने लाखोच्या संख्येने कूच करत आहेत. हमीभावासाठी शेतकरी देशाच्या राजधानीकडे येत आहे आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचे फवारे मारले जात आहेत पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत. वाहने जाऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दमनशाही केली नव्हती ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. मोदी सरकार आता शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

ही एक प्रकारची झुंडशाही आहे स्वामीनाथनला तुम्ही भारतरत्न देता स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी मागणी केली होती हेच मोदी 2014 पासून सांगत आहेत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट केलं जाईल पण शेतकरी आंदोलन करतो आहे त्यांना तुम्ही रोखत आहात. लवकरच उद्धव साहेब एक पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. दिल्लीतली शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या भूमिकेच्या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करतो, असे राऊत म्हणाले.

पटेल यांची खासदारकी 2027 पर्यंत

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत होती. तसेच नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले बाबा सिद्दिकी यांचे नाव आले होते. पार्थ पवार यांच्यासाठी तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक होते. त्यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी न दिल्यास बंड पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली. प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभा खासदारकी 2027 पर्यंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल एकमेव खासदार आहे.

पटेल यांना संधी का ?

राष्ट्रवादी काँग्रेमधील बंडखोरीनंतर शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांनी पटेल यांची राज्यसभा खासदारकी रद्द करण्याची मागणी राज्यसभा सभापतींकडे केली आहे. त्याचा निकाल आल्यास आणि पटेल यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास पटेल यांची खासदारकी रद्द होणार आहे. यामुळे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याची खेळी अजित पवार यांनी घेतली. तांत्रिक कारणामुळे पटेल यांना उमेदवारी दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.