Sanjay Raut | हिंमत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी स्वत:चा… संजय राऊत यांचं आव्हान काय ?

अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी भाजपमध्ये शिरकाव केल्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत, हा वादाचा मुद्दा आहे

Sanjay Raut | हिंमत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी स्वत:चा... संजय राऊत यांचं आव्हान काय ?
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 10:43 AM

नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी भाजपमध्ये शिरकाव केल्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचं नाही. पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत, हा वादाचा मुद्दा आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना, तर तुम्ही स्वत:चा पक्ष स्थापन करा, अशा शब्दांत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले. तुमचा पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा. होय, हा माझा पक्ष आहे. मला मत द्या. तुम्ही अशा चोऱ्या-माऱ्या, दरोडेखोरी करून, असे पक्ष चोरून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं आहे. येत्या काळात याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा देत संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला.

उद्या तुमच्यावरही ही वेळ येऊ शकते

आज तुम्ही अशा पद्धतीने पक्ष हिसकावला आहे, पण हीच वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. लक्षात ठेवा, उद्या याच पद्धतीने पक्ष तुमच्याही हातातून जाऊ शकतो, असेही राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना सुनावलं. आज मोदी, शहांची गॅरंटी ही तात्पुरती आहे. उद्याचा काळा हा महाभयंकर असेल. भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राऊतांनी दिला.

मोदी- शहांचा महाराष्ट्रावर राग

निवडणूक आयोग आता भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून तो मोदी-शाहंचा निवडणूक आयोग झाला आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या बाबतीत हे निर्णय घेतले जात आहेत. मोदी-शहा या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे, त्यांना बदला घ्यायचं आहे हे आता सिद्ध झालं आहे. त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवतात म्हणून ते दोन्ही पक्ष फोडून मोदी-शहांनी सूड उगवाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत महत्त्वाचा निकाल दिला. अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यांनी पुन्हा उभ राहण्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली असून या निर्णयाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...