Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडाख कुटुंबाच्या कठीणकाळात शिवसेनेचा ‘तारणहार’ सरसावला, मिलिंद नार्वेकर सांत्वनासाठी नगरला

गळफास घेतल्याने गौरी प्रशांत गडाख यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं.

गडाख कुटुंबाच्या कठीणकाळात शिवसेनेचा 'तारणहार' सरसावला, मिलिंद नार्वेकर सांत्वनासाठी नगरला
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 11:44 AM

अहमदनगर : गडाख कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) अहमदनगरला गेले. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या वहिनी गौरी प्रशांत गडाख (Gauri Gadakh) शनिवारी रात्री राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. गळफास घेतल्याने गौरी यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं. (Shivsena Secretary Milind Narvekar visits Gadakh family in Ahmednagar after demise of Gauri Prashant Gadakh)

गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी. गौरी या लोणी येथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत. गडाख कुटुंबाच्या कठीण काळात त्यांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर सोनाईला गेले होते.

गौरी गडाख शनिवारी रात्री राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गौरी गडाखांच्या आत्महत्येने सोनई गावावर शोककळा पसरली आहे.

गौरी यांच्या पश्चात पती प्रशांत गडाख, नेहल आणि दुर्गा या दोन मुली आहेत. गौरी गडाख समाजकारणात सक्रिय होत्या. अनेक समाजोपयोगी उपक्रमही त्यांनी राबवले होते. त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोनई येथे वांबोरीत रविवारी सायंकाळी गौरी गडाख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना पुतणे उदयन गडाख यांनी अग्नी दिला.

शंकरराव गडाखांचा शिवसेनेत प्रवेश

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधत 11 ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

शिवसेनेचे‌ माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नगर जिल्ह्यात‌ शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. मात्र शंकरराव गडाख यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ती भरुन निघेल, असा विश्नास व्यक्त केला जातो. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या प्रवेशाने आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.

शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेदरम्यान शिवसेनेला पाठिंबा दिला होता. गडाख यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने नगर जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

शंकरराव गडाख कोण आहेत?

(Shivsena Leader Milind Narvekar visits Gadakh family in Ahmednagar after demise of Gauri Prashant Gadakh)

  • शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव
  • अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आमदार
  • शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली
  • मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर सत्तास्थापनेदरम्यान शिवसेनेला पाठिंबा
  • उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री
  • शंकरराव गडाख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही निकटवर्तीय

संबंधित बातम्या

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिनी राहत्या घरात मृत आढळल्या

गौरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच, शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट

अनिल भैय्यांची पोकळी भरुन काढणार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

(Shivsena Leader Milind Narvekar visits Gadakh family in Ahmednagar after demise of Gauri Prashant Gadakh)

डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.