सिद्धगंगा मठाचे महंत शिवकुमार स्वामींचं निधन
बंगळुरु: कर्नाटकातील तुमकुरु इथल्या सिद्धगंगा मठाचे (Siddaganga Math) प्रमुख डॉ. शिवकुमार स्वामी (Shivakumara Swamiji) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांचं वय 111 वर्ष होते. लिंगायत-वीरशैव समाजाच्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश असलेले शिवकुमार स्वामी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. शिवकुमार स्वामी यांच्या मृत्यूनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. […]
बंगळुरु: कर्नाटकातील तुमकुरु इथल्या सिद्धगंगा मठाचे (Siddaganga Math) प्रमुख डॉ. शिवकुमार स्वामी (Shivakumara Swamiji) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांचं वय 111 वर्ष होते. लिंगायत-वीरशैव समाजाच्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश असलेले शिवकुमार स्वामी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. शिवकुमार स्वामी यांच्या मृत्यूनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी ट्विट करुन शिवकुमार स्वामी यांना श्रद्धांजली दिली. शिवकुमार स्वामीजींच्या पार्थिवावर उद्या 22 जानेवारीला दुपारी 4.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वामीजींना जिवंत देव (वॉकिंग गॉड) म्हटलं जात होतं. मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, “शिवकुमार स्वामीजींच्या निधनाने राजकीय दुखवटा जाहीर करत आहे. सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालये बंद राहतील”
शिवकुमार स्वामीजींच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांनी मठावर हजेरी लावली. आजच मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, सदानंद गौडा हे स्वामीजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मठात गेले होते.
तुमकुरु मठ
कर्नाटकातील सर्व 30 जिल्ह्यांमध्ये मठांचं जाळ पसरलं आहे. जातीय समीकरणांमुळे मठांचं वर्चस्व आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसाठी मठांचं वेगळं महत्त्व आहे. राज्यात सर्वाधिक लिंगायत समुदाय असून त्यांची लोकसंख्या 18 टक्के आहे.
लिंगायत समाजाचा मुख्य मठ सिद्धगंगा बंगळुरुपासून जवळपास 80 किमी लांब तुमकुरु इथं आहे.