Siddharth Chandekar | ‘सांग तू आहेस का’ मालिकेतून सिद्धार्थ चांदेकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!

लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Siddharth Chandekar | ‘सांग तू आहेस का’ मालिकेतून सिद्धार्थ चांदेकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 3:40 PM

मुंबई : ‘जिवलगा’ मालिकेनंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी लवकरच एक हटके आणि नव्या धाटणीची मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सांग तू आहेस का’ (Sang Tu Ahes ka) असे या नव्या मालिकेचे नाव असणार आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असे म्हणत, ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने अशीच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे (Siddharth Chandekar New Serial On Star Pravah Sang Tu Ahes ka).

विशेष म्हणजे लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या मालिकेत मुख्य भूमिकेत असून लवकरच ही मालिका भेटीला येणार आहे.

रसिकांना खिळवून ठेवणारी गोष्ट

या मालिकेचे वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘एखादी गोष्ट रसिकांना खिळवून ठेवते त्यांची उत्कंठा वाढवते असं ऐकलं की, ती गोष्ट सांगायला अजून हुरुप येतो. सांग तू आहेस का अशीच मालिका आहे. त्याचं कथानक अनेक प्रश्न पडत पुढे पुढे सरकणारं आहे. लव्हस्टोरी आणि त्यात गूढ असा या मालिकेचा बाज असल्यामुळे पुढे काय उलगडेल याची हुरहुर सतत मनाला लागून राहिल.’

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘सांग तू आहेस का’ या मालिकेचे निर्माते विद्याधर पाठारे असून दिपक नलावडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत (Siddharth Chandekar New Serial On Star Pravah Sang Tu Ahes ka).

टीआरपी शर्यतीत बाजी

सगळ्या लोकप्रिय वाहिन्यांना मागे टाकत गेल्या काही आठवड्यांपासून स्टार प्रवाह ही वाहिनी क्रमांक एकवर आली आहे. यावर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांचा टीआरपी देखील वाढला आहे. ‘रंग माझा वेगळा’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. आता आणखी एक मालिका स्टार प्रवाहवर येत असून या मालिकेचा बाज गूढ असा आहे.

ती मालिका नेहमी काय आहे, कशी ती रंगत जाणार आहे ते अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पण हळूहळू या मालिकेचे नवे प्रोमो येतील आणि कथानक उलगडत जाईल. तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा ‘चॉकलेट बॉय’ सिद्धार्थ चांदेकर आता या निमित्ताने पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर येतो आहे. याआधी स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ‘जिवलगा’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित झाली होती. ‘जिवलगा’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.

(Siddharth Chandekar New Serial On Star Pravah Sang Tu Ahes ka)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.