मुंबई : सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill) यांनी त्यांच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. त्यांचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. ‘बिग बॉस 13’मध्ये सिद्धार्थ आणि शहनाझ या जोडीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. सिद्धार्थ आणि शहनाझचा कोणताही फोटोशूट, व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतो. आजच सिद्धार्थ आणि शहनाझ यांचे ‘शोना शोना’ हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. गाणे येताच हे सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे.‘सिद-नाझ’ या जोडीचं दुसरं व्हिडीओ गाणं प्रसिध्द झाले आहे.(Sidharth and Shahnaz’s ‘Shona Shona’ song on social media)
हे गाणं टोनी कक्कर आणि नेहा कक्कड़ यांनी गायलं आहे. सिद्धार्थ शुक्ला याने या गाण्याचे पोस्टर आज (24 नोव्हेंबर) इंन्सटाग्रामवर पोस्ट केले होते. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले होते की, ‘या गाण्यात शहनाझ आणि सिद्धार्थची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.’ याआधीही सिद्धार्थने या गाण्याचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. या गाण्यात सिद्धार्थ शहनाझची प्रशंसा करताना आणि तिच्यामागे धावताना दिसत आहे.
या गाण्याचे पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाझ रेट्रो स्टाईलमध्ये दिसले होते. शहनाझ गिलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सॉन्गचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. पोस्टरमध्ये दोघेही रोमँटिक स्टाईलमध्ये एकमेकांना पहात होते. सिद्धार्थ आणि शहनाझ यांचे हे एकत्र दुसरे गाणे आहे. यापूर्वी टोनी आणि नेहा कक्कर यांनी सिद्धार्थबरोबर हार्ट ब्रेकिंग सॉंगमध्ये काम केले होते. सिद्धार्थ आणि शहनाझ या जोडीला त्यांचे चाहते सिड नाज म्हणतात. विशेष म्हणजे सिडनाझचे लाखो चाहते आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 14’च्या घरात अचानक मोठा ट्विस्ट आला होता. तूफानी सिनिअर आणि काही स्पर्धक या स्पर्धेतून बाहेर पडले होते. एका टास्क दरम्यान, सिद्धार्थ आणि त्याच्या टीममध्ये असलेले पवित्रा पुनिया, एजाज खान हरल्याने त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार होते. मात्र, पवित्रा आणि एजाजला घराबाहेर न काढता सिक्रेट रूममध्ये ठेवले होते. त्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला होता.
सिद्धार्थच्या टीममध्ये निक्की तंबोलीदेखील सामील होती. मात्र, निक्कीकडे घराचे विशेषाधिकार असल्याने ती घराबाहेर जाण्यापासून बचावली होती. ‘बिग बॉस 14’च्या घरातले हे पहिले मोठे एलिमिनेशन ठरले. पवित्रा पुनिया या पर्वाची विजेती ठरले, असा अंदाज प्रेक्षकांनी लावल्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला होता.
संबंधित बातम्या :
(Sidharth and Shahnaz’s ‘Shona Shona’ song on social media)