कृषी कायद्यांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला राज्यात मोठा प्रतिसाद; 50 लाखांपेक्षा जास्त सह्या: बाळासाहेब थोरात

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसकडून विरोध होतोय. देशात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम राबवली गेली.

कृषी कायद्यांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला राज्यात मोठा प्रतिसाद; 50 लाखांपेक्षा जास्त सह्या: बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 7:14 PM

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसकडून विरोध होतोय. देशात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम राबवली गेली. या मोहिमेत 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करुन या मोहिमेत सहभाग नोंदवला. (signature campaign against the Agriculture Act by congress, huge response said Balasaheb Thorat)

दरम्यान, या सह्यांचे एक निवदेन मंगळवारी (17 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्षप्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी 2 कोटी सह्यांची मोहीम राबवण्याचे निश्चित केले होते. 2 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केले. हे कायदे शेतकऱ्यांना कसे उद्ध्वस्त करणारे आहेत याची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.

“कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान किसान अधिकार दिवस, धरणे आंदोलन, राजभवान येथे जाऊन राज्यपालांना निवेदन तसेच महाव्हर्च्युअल किसान रॅलीच्या माध्यमातूनही भाजप सरकारच्या या अन्यायी कायद्याला विरोध केला. या महामेळाव्यात राज्यातील 10 हजार गावं आणि खेड्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. तसेच सह्यांची मोहीमही राबवण्यात आली,” असं थोरात म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा या कायद्याविरोधात संघर्ष सुरुच राहील असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्याचा नावाखाली बेकायदेशीर व्यापार, केंद्राच्या आदेशाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा विरोध

शेतकरीविरोधी कायद्याविरोधात जळगावातही काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांना कडाडून विरोध

राज्यघटनेनुसार कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही; काँग्रेसचा दावा

(signature campaign against the Agriculture Act by congress, huge response by farmers said Balasaheb Thorat)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.