Relationship Tips: खरचं तिला तुम्ही आवडता का? ही लक्षणं सांगतील तिच्या मनातल्या गोष्टी…
Love Relationship: प्रेमामध्ये आजकाल अनेकजण काहीही करायला तयार असतात. प्रेमामध्ये पडलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. प्रेम एखाद्या व्यक्तीच्या गुणांमुळे होतो. परंतु अनेकवेळा आपल्या जोडीदाराला आपल्याबद्दल तशाच भावना आहेत का हा प्रश्न अनेकवेळा मनामध्ये येतो. चला तर जाणून घेऊया आपल्या जोडीदार आपल्यावर प्रेम करतो की नाही.
प्रेम म्हणजे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकेच याचे उत्तर कठिण आहे. आजकल अनेकांच्या मनामध्ये दुसऱ्यावषयी प्रेम भावना योतात त्याला एकतर्फी प्रेम म्हटले जाते. परंतु आपण जास्त काळ एकतर्फी प्रेमामध्ये काढू शकत नाही. खरतर अनेकांना असे वाटते की आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणी तरी व्यक्ती आली पाहिजेल जिचं आपल्यावर मनापासून प्रेम असेल. परंतु अनेकवेळा आपल्याला समजत नाही की समोरची व्यक्ती किंवा आपला जोडीदार ज्याच्यासोबत आपण आपलं आयुष्य घालवण्याचा विचार करतोय त्या मुलीला आपल्यावर प्रेम आहे का?
जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो तसचं समोरची व्यक्ती किंवा आपला जोडीदार आपल्यावर तितकंच प्रेम करतोय की नाही या गोष्टीची आपल्याला खात्री नसते. तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न आपल्या मनाला खूप गोंधळून टाकणारे असतात. अशा प्रश्नांचे उत्तर शोधने सोपे नसते. परंतु तुमच्या जोडीदाराच्या काही वागणूकिंमधून तुम्हाला समजू शकते की तिच्या मनामध्ये तुमच्या बद्दल प्रेम आहे की नाही.
तुमच्या भावनांचा आदर करते…
जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत चर्चा सुरु असते. त्यावेळी जर तुमची जोडीदार तुमच्या बोलण्याकडे लक्ष्पूर्वक ऐकत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती तुमच्या सर्व भावना समजून घेते आणि तिला तुमची काळजी वाटते. तुमची जोडीदार कधीच तुमच्या बोलण्यात व्यत्यय आणत नाही आणि तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी देते.
तिला तुमचा सहवास आवडतो…
जेव्हा तुमची जोडीदार तुमच्या सोबत असते त्यावेळी तिला कोणत्याही दुसऱ्या गोष्टींचे भाण नसते. तिला तुमच्यासोबत वेळ घालवण्यास आवडतं. तिला तुमच्या सोबत वेळ घालवायला आवडते आणि तुमच्या सोबत जास्त वेळ बोलायला आवडतं आणि तुमचा जोडीदार तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे नवीन मार्ग शोधते.
तुमची साथ देते…
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये आणि चांगल्या आणि वाईट काळामध्ये तुमची साथ देते. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे अढथळे आणि अडचणी आल्या तरीही तुमची जोडीदार जर तुमच्या सोबत असेल आणि तुमची साथ देईल आणि तिला शक्य असेल तेवढा तुम्हाला पाठिंबा देण्यास प्रयत्न करेल याचा अर्थ तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
तुमची प्रशंसा करते…
जेव्हा तुमची जोडीदार तुमच्या कामामधील प्रगतीमुळे तुमची प्रशंसा करते याचा अर्थ तिला तुमच्या प्रगतीमुळे आनंद होतो. तुमजी जोडीदार जर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा देईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल अशी जोडीदार तुमच्यासाठी योग्य असते.
एकतर्फी प्रेमाचे लक्षण :
१) तिला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही आणि तुम्हाला जास्त वेळ देत नाही.
२) तिला तुमच्या आयुष्यामधील गोष्टींमुळे फरक पडत नाही आणि भावनांची काळजी नाही.
३) तुमच्या प्रगतीचे कौतुक कळत नाही आणि तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते.