सिंधुदुर्ग : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना (Sindhudurg Corona Positive Patient) कोरोनामुक्त झालेल्या सिंधुदुर्गात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. लॉकडाऊनदरम्यान मुंबईतील हॉटस्पॉट परिसरातून सिंधुदुर्गात गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन घोषित (Sindhudurg Corona Positive Patient) करण्यात आलं आहे. मात्र 20 एप्रिलला मुंबईतील हॉटस्पॉट भागातून एक कुटुंब सिंधुदुर्गातील कुडाळ येथे दाखल झालं होतं. यातील 15 वर्षीय मुलीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर तिच्या आई वडिलांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. नवीन रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
दरम्यान 3 एप्रिलला मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली प्रवास करणाऱ्या एका तरुणाला सहप्रवाशाकडून कोरोनाची लागण झाली होती. त्याने 19 मार्चला मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास केला होता. या रेल्वे गाडीत एस 3 डब्यात कोरोना बाधित रुग्ण होता. या तरुणाला सहप्रवाशाकडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
हेही वाचा – मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली प्रवास केलेला सिंधुदुर्गातील रुग्ण कोरोनामुक्त, दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह
यानंतर 14 दिवसांनी त्याचे स्वॅब टेस्ट घेतली असता त्याचे दोन्ही निगेटिव्ह आले. या चाचणीचा अहवाल 3 एप्रिलला मिळाला. मात्र त्यानंतरही पुढचे काही दिवस त्याला निगराणी खाली ठेवण्यात आले होते. यानंतर 9 एप्रिलला त्याला डिस्चार्ज देण्यात आला. पुढील 14 दिवस त्याला होम क्वारंटाईन केले होते.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वा:स सोडला होता. मात्र आता पुन्हा सिंधुदुर्गात कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झालं (Sindhudurg Corona Positive Patient) आहे.
संबंधित बातम्या :
जळगावात सात नवे कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 31 वर
मुंबईतील वडाळ्यात 12 जणांना कोरोना, फक्त एकावर रुग्णालयात उपचार, 11 जण घरीच