अनू मलिकनंतर आता आदित्य नारायणला इंडियन आयडल शोमधून काढले?

इंडियन आयडल सीझन 11 सुरुवातीपासून वादात असल्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे परीक्षक गायक अनू मिलक यांना कार्यक्रमातून काढण्यात आल्यामुळे त्यांच्या ऐवजी गायक हिमेश रेशमियाला रिप्लेस केले.

अनू मलिकनंतर आता आदित्य नारायणला इंडियन आयडल शोमधून काढले?
| Edited By: | Updated on: Dec 12, 2019 | 7:12 PM

मुंबई : इंडियन आयडल सीझन 11 सुरुवातीपासून वादात असल्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे परीक्षक गायक अनू मिलक यांना कार्यक्रमातून काढण्यात आल्यामुळे त्यांच्या ऐवजी गायक हिमेश रेशमियाला रिप्लेस केले. आता अनू मलिक यांच्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक आदित्य नारायणच्या ऐवजी जय भानुशालीला (Singer Aaditya Narayan Indian Idol) रिप्लेस केले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आदित्य नारायणने कार्यक्रम सोडल्याचे वृत्त खोटे असल्याची माहिती एका वृत्त संस्थेने दिली आहे. आदित्य कार्यक्रम सोडणार या चर्चेनंतर आदित्य नारायण (Singer Aaditya Narayan Indian Idol) आणि जय भानुशाली या दोघांसोबत एका वृत्त संस्थेने संपर्क केला. पण दोघांनीही हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले.

“मला खरच माहित नाही या बातम्या कुठून येतात. माझे काही लाईव्ह कॉन्सर्ट आहेत. त्यामुळे मी एक दिवस कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी अनुपस्थित राहिलो म्हणून मी कार्यक्रम सोडल्याच्या चर्चा सुरु झाल्या. हा खूप मोठा कार्यक्रम आहे. मी का सोडू”, असं आदित्य नारायणने सांगितले.

“मी इंडियन आयडल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. पण फक्त दोन दिवसांसाठी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. मी आदित्यच्या जागी कार्यक्रमात रिप्लेस होत नाही”, असं जय भानुशाली यांनी सांगितले.

एका मुलाखती दरम्यान, आदित्यला प्रश्न विचारण्यात आला की, जय इंडियन आयडलचे सूत्रसंचालन करणार? यावर आदित्य म्हणाला, “मला आनंद आहे की माझ्या अनुपस्थितीत जय सूत्रसंचालन करतोय. असे यापूर्वीही झाले आहे. मी जेव्हा सा रे गा मा पा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होतो. तेव्हा मला कामा निमित्त मध्येच जावे लागले होते. तेव्हाही माझ्या अनुपस्थितीत जयने काही एपिसोड सूत्रसंचालन केले होते. मी त्याचा खूप आभारी आहे.”