रक्षाबंधनादिवशी रणरागिणीचे रुप, बहिणींकडून भावाचा अवैध दारुचा व्यवसाय उद्ध्वस्त
बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यामधील घाटबोरी गावात प्रकाश चव्हाण यांचा अवैध दारु व्यवसाय (Sisters ruined brother Illegal liquor business) होता.
बुलडाणा : संपूर्ण देशभरात आज (3 ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी दोन बहिणींनी आपल्या भावाचा अवैध दारुचा व्यवसाय उद्ध्वस्त केला आहे. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यात ही घटना घडली. विशेष म्हणजे या कामगिरीत गावातील इतर महिलांनीही सुद्धा सहकार्य केलं. (Sisters ruined brother Illegal liquor business)
बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यामधील घाटबोरी गावात प्रकाश चव्हाण यांचा अवैध दारु व्यवसाय होता. त्याला बेबी जाधव आणि सुनिता काळे या दोन बहिणी आहेत. त्याच्या या दोन्ही बहिणींनी भावाचा अवैध दारुचा व्यवसाय उद्धवस्त केला. यात गावातील महिलांनीही त्यांना मदत केली.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
आज आपल्या भावाला राखी बांधण्याऐवजी त्यांनी सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार, तटांमुक्ती अध्यक्ष यांना भाऊ मानत राखी बांधली. त्यामुळे या नारीशक्तीचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
गावातील अवैध दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलेही दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे या महिलांनी गावातील अवैध दारू बंद करायची, असा निश्चय केला होता. त्यामुळे दोन्ही बहिणींनी एकत्र येऊन प्रकाश चव्हाण यांचा दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. (Sisters ruined brother Illegal liquor business)
संबंधित बातम्या :
नेटफ्लिक्सच्या मेंबरशिपबाबत तुम्हालाही मेल आलाय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान!
प्रियकराला घरी बोलावून सोने-पैसे लुटले, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक