सहा वर्षाच्या मुलाची अपहरणानंतर हत्या, विवाहबाह्य संबंधातून क्रूर कृत्य केल्याची चर्चा

सहा वर्षीय मुलाचे अपहरण करुन क्रूरपणे हत्या (child murder) केल्याची धक्कादायक घटना मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी गावात घडली आहे.

सहा वर्षाच्या मुलाची अपहरणानंतर हत्या, विवाहबाह्य संबंधातून क्रूर कृत्य केल्याची चर्चा
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 6:47 PM

भंडारा : सहा वर्षीय मुलाचे अपहरण करुन क्रूरपणे हत्या (child murder) केल्याची धक्कादायक घटना मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी गावात घडली आहे. विहान लांजेवार असं हत्या झालेल्या सहा वर्षीय मुलाचे नाव आहे. विवाहबाह्य संबंधातून ही हत्या केल्याची गावात चर्चा आहे. असं असलं तरी, अधिक तपासानंतर हत्येचं खरं कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. (Six year of child murder in Bhandara District)

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील सालेबर्डी गावातील सहा वर्षांचा मुलगा 22 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. तशी तक्रार विहानच्या वडिलांनी आंदळगाव पोलिसात दिली होती. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी मुलाचा शोध घेणे सुरु केले. यावेळी तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना गावातीलच निलेश गजभिये नावाच्या तरुणावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.  (Six year of child murder in Bhandara District)

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली

दरम्यान, संशयित निलेशला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरु केली. मात्र, आरोपीने पोलिसांना दोन दिवस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलाचा गळा दाबून खून केल्याचे कबूल केले. आरोपीने 22 तारखेलाच विहानचे अपहरण करून त्याचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याने विहानचा मृतहेह गावापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या पहेला गावाशेजारच्या जंगलशिवारात फेकून दिला.

संशयिताने खून केल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी घटनास्थळ गाठत विहानचा मृत्यूदेह ताब्यात घेतला. दरम्यान, आरोपीने खून केल्याचे कबूल केले असले तरी खुनाचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून ओरोपीची कसून चौकशी सुरु आहे. हा खून विवाहबाह्य संबंधातून झाला असल्याची गावात चर्चा आहे. असे असले तरी, अधिक तपास केल्यानंतरच आरोपीने हा खून नेमका कशामुळे केला, हे समोर येईल असे पोलिसांनी सांगितले. (Six year of child murder in Bhandara District)

संबंधित बातम्या :

नशेबाजीसाठी नवनवीन क्लुप्त्या; शितपेयामध्ये औषध टाकून नशा

ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप

भिवंडीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार, नागरिकांचा रस्त्यावर उतरुन संताप

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.