200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलापर्यंत पोहोचण्यात एनडीआरएफला यश
पुणे : सहा वर्षीय मुलगा 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची घटना पुण्यातील आंबेगावात घडली आहे. पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून स्थानिकांकडूनही मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुलाचा आवाज ऐकायला येत आहे. शिवाय त्याला ऑक्सिजनही सोडण्यात आलाय. सुदैवाने या मुलापर्यंत पोहोचण्यात एनडीआरएफला यश आलंय. […]
पुणे : सहा वर्षीय मुलगा 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची घटना पुण्यातील आंबेगावात घडली आहे. पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून स्थानिकांकडूनही मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुलाचा आवाज ऐकायला येत आहे. शिवाय त्याला ऑक्सिजनही सोडण्यात आलाय. सुदैवाने या मुलापर्यंत पोहोचण्यात एनडीआरएफला यश आलंय. त्यामुळे मुलगा सुखरुप असल्याचं समजतंय.
रवी पंडित मिल असं या मुलाचं नाव आहे. तो बोअरवेलमध्ये नेमका कसा पडला याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. बोअरवेल 200 फूट खोल असला तरी सुदैवाने रवी हा फक्त 10 फुटांवर अडकला आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
उघडे बोअरवेल ही मोठी समस्या आहे. याअगोदरही मुलं खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आंबेगावातील घटनेचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.