Skin Care Tips | हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ सवयी गरजेच्या!
सकाळी लवकर उठणे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर, आपल्या त्वचेसाठी देखील लाभदायक आहे.
मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आपण आपल्या त्वचेकडे लक्ष देत नाही. तसेच वाढत्या प्रदूषणाचा आपल्या त्वचेवरही परिणाम होत असतो. चमकदार आणि डागमुक्त त्वचा सर्वांनाच हवी असते (Skin Care Tips). आपली त्वचा चमकदार बनावी, असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु, यासाठी आपल्याला आपल्या सवयींमध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. तसेच, काही नवीन सवयी अंगीकाराव्या लागतील. यातील सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे! सकाळी लवकर उठणे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर, आपल्या त्वचेसाठी देखील लाभदायक आहे (Skin Care Tips For Healthy and Glowing skin).
सकाळी पाणी प्या.
जर तुम्हाला चमकणारी आणि निरोगी त्वचा हवी असेल तर, दररोज सकाळी लवकर जागे व्हा आणि रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्या. ही सवय आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ काढून टाकते आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक देते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे (Skin Care Tips For Healthy and Glowing skin).
घाम गाळा.
त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यासाठी नेहमी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. कसरत करण्याची सवय कधीही सोडू नका. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे कसरत आणि व्यायामामुळे तुमचे रक्त परिसंचरण वाढते. परिणामी हृदयाचची गती वाढते आणि शरीरातून घाम निघून जातो. या घामातून अतिरिक्त चरबी निघून गेल्याने शरीर निरोगी होते. तसेच, आपल्याला चमकणारी आणि निरोगी त्वचा प्राप्त होते. व्यायामामुळे त्वचेतील कोलेजेनचे उत्पादन सुधारते.
क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा.
आपण स्किनकेअर उत्पादने जास्त वापरत नसाल तरी, किमान मूलभूत स्किनकेयर नित्यक्रम दररोज पाळलेच पाहिजेत. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील. ही उत्पादने निवडताना प्रथम आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. त्यानुसारच उत्पादने खरेदी करा. अन्यथा कितीही महागडी उत्पादनामुळे आपल्याला फरक दिसणार नाही. त्वचेवर टोनर लावण्यासाठी सॉफ्ट कॉटन बॉल वापरा. त्यानंतर क्लीन्झर वापरून चेहऱ्यावरील धूळ, घाण काढून टाका. शेवटी मॉइस्चराईझर लावा. याने आपल्या त्वचेला चमक येईल.
यासह, आठवड्यातून किमान दोनदा त्वचेला एक्सफोलिएट करण्यास विसरू नका. याशिवाय उन्हात बाहेर पडण्यापूर्वी एसपीएफ असलेले सनस्क्रीन जरूर वापरा.
(Skin Care Tips For Healthy and Glowing skin)
Yoga Tips | शरीर लवचिक आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेकारक!https://t.co/pvYFIwW4JS#yoga #healthcare #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020