Sleep Research | संशोधकांचा नवा दावा, नेहमीपेक्षा ‘इतका’ वेळ अधिकची झोप दिवसभर ऊर्जा देईल!

पुरेशा झोपेमुळे व्यक्तीच्या मनःशांतीवर प्रभाव पडतो, असे एका संशोधनात सिद्ध करण्यात आले आहे.

Sleep Research | संशोधकांचा नवा दावा, नेहमीपेक्षा ‘इतका’ वेळ अधिकची झोप दिवसभर ऊर्जा देईल!
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 5:36 PM

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात (Sleep Research study) सिद्ध झाले आहे. दिवसभरात एक व्यक्ती त्याच्या सोबत घडणाऱ्या घटनांबाबत किती जागरूक असतो यावर त्याची मनःशांती (Mindfulness) अवलंबून असते. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. (Sleep Research Study reveal sleeping for extra 29 minute leads to daily well being and mindfulness)

पुरेशा झोपेमुळे व्यक्तीच्या मनःशांतीवर प्रभाव पडतो, असे दक्षिण फ्लोरिडातील विश्वविद्यापीठाच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या संशोधनात सिद्ध करण्यात आले आहे. रात्री घेतलेल्या पुरेशा झोपेमुळे दिवसभर झोप येत नाही. याचे संशोधन करण्यासाठी एका नर्सच्या समूहाला एकत्रित करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या या समूहाला व्यवस्थित काम करण्यासाठी पुरेशा झोपेची आवश्यकता असते. भरपूर वेळे काम करावे लागत असल्याने, त्यांना झोप कमी मिळते आणि त्यासंबंधित समस्या निर्माण होतात. कोरोना काळात सतत जागरूक राहावे लागत असल्याने, या समूहासाठी पुरेशी झोप आणि आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

सेओमी ली यांचा शोध निष्कर्ष

युएसएफमधील सहायक प्राध्यापक, लेखक सोओमी ली यांनी सांगितले की, ‘कोणीही झोपेतून उठून एखाद्या गोष्टीबाबत जागरूक होऊ शकतो. मात्र याचा अर्थ असा नाही की तो ठीक असेल. थकल्यामुळे किंवा ताणामुळेदेखील असे होऊ शकते.’

यूएसएफ आणि मॉफिट कॅन्सर सेंटरमधील डॉ. ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन आठवड्यांसाठी 61 नर्सच्या समूहावर झोपेशी निगडीत आरोग्याच्या अनेक वैशिष्ट्यांची तपासणी केली. यात त्यांना असे आढळून आले की, ‘अर्धा तास अधिकच्या झोपेमुळे त्यांची झोपही चांगली झाली आहे आणि त्यांचे कामही उत्तम होते आहे. दररोज अर्धा तासाच्या अधिक झोपेमुळे या लोकांना दिवसभरात इतर वेळी झोप लागत नाही. या दोन आठवड्यांच्या अभ्यास कालावधीत 66 टक्क्यांपेक्षा कमी नर्सेसमध्ये निद्रानाशाची समस्या कमी झाली.’ (Sleep Research Study reveal sleeping for extra 29 minute leads to daily well being and mindfulness)

तुम्हाला आठवतो का दिनक्रम?

या नमुना उमेदवारांना त्यांचा दिनक्रम किती आठवतो आणि झोपेमुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर कसा परिणाम होतो, यावरून संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. याशिवाय सहभागींनी रियललाइफ एक्सपी स्मार्टफोन अॅप्लिकेशनचा वापर करून दोन आठवड्यांकरिता दिवसातून तीन वेळा झोपेसंबंधित प्रश्नांची उत्तरे दिली होती.

‘माईंडफुल अटेन्शन अवेयरनेस स्केल’द्वारे दैनंदिन जागरूकता मोजली गेली. या दरम्यान, सहभागींना अनेक प्रश्न विचारले गेले. याव्यतिरिक्त झोप आणि जागृत होण्याच्या पद्धती मोजण्यासाठी मनगटावर बांधले जाणारे अ‍ॅक्टिवा स्पेक्ट्रम डिव्हाइस या नर्सेसनी 2 आठवड्यांसाठी परिधान केले होते.

(Sleep Research Study reveal sleeping for extra 29 minute leads to daily well being and mindfulness)

संबंधित बातम्या : 

Sleeping Disorder | कमी झोपेमुळे ‘स्लीप एपनिया’चा धोका, जाणून घ्या लक्षणांबद्दल…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.