MPSC चा ढिसाळ कारभार ; आयोगाकडून  उत्तरसूचित चुकीचे उत्तरे; बरोबर उत्तरे दिलेले प्रश्न रद्द केल्यामुळे विद्यार्थी नापास

आयोगानं घेतलेल्या या संयुक्त पूर्व परीक्षेत झालेल्या चुकीमुळे आयोगला पहिल्यांदाच तिसरी उत्तरसूची सुध्दा प्रसिद्ध करावी लागली. मात्र तिसऱ्यांदा ही उत्तरसूचीमध्ये काही बरोबर प्रश्न रद्द करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर त्याचा परिणाम झाला आहे.

MPSC चा ढिसाळ कारभार ; आयोगाकडून  उत्तरसूचित चुकीचे उत्तरे; बरोबर उत्तरे दिलेले प्रश्न रद्द केल्यामुळे विद्यार्थी नापास
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 5:53 PM

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आयोगाने 2021 मध्ये घेतलेल्या गट ‘ब’ च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत अनेक चुका आढळून आल्या आहेत. मात्र या मध्ये दुरुस्ती करण्याऐवजी आयोगाने बरोबर उत्तरे असलेले प्रश्नही रद्द केले. याचा मोठा फटका राज्यातील परीक्षार्थींना बसला आहे. हे प्रश्न रद्द केल्याने निगेटिव्ह मार्किंगमुळे राज्यातील जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आयोगाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 20 डिसेंबरला होणार सुनावणी होणार आहे.

उत्तर पत्रिकाही करावी लागली प्रसिद्ध आयोगानं घेतलेल्या या संयुक्त पूर्व परीक्षेत झालेल्या चुकीमुळे आयोगला पहिल्यांदाच तिसरी उत्तरसूची सुध्दा प्रसिद्ध करावी लागली. मात्र तिसऱ्यांदा ही उत्तरसूचीमध्ये काही बरोबर प्रश्न रद्द करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर त्याचा परिणाम झाला आहे. 3 ते 4 हजार मूलांचे 0.25 ते 3 गुण कमी झालेत. आयोगाच्या चुकीची शिक्षा विना कारण विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम 

कोरोनामुळे आधीच परीक्षा ना झाल्याने विद्यार्थ्यांची तब्बल दोन वर्षे वाया गेली आहेत. कोरोनानंतर आता पहिल्यांदाच परीक्षा झाली तर त्यात या चुकांमुळे अनेक मुलांना मुख्य परीक्षेची मिळणारी संधीही हुकणार आहे. या सगळयाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झाला, असून अनेक विद्यार्थी तणावाचा सामना करत आहेत

Entertainment : ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज या आठवड्यात मोठा पडदा आणि OTTवर होणार प्रदर्शित

इथे भामटे लस न घेताच लसीकरण प्रमाणपत्र देत होते, पोलिसांनी घडवली अद्दल

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 18 December 2021

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.