PHOTO : मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कात सापांचा सुळसुळाट
दादर परिसरातील शिवाजी पार्क मैदानात वाढलेल्या गवतात मोठ्या प्रमाणात सापांचा वावर असल्याचं बोललं जात होतं. (Snake in Dadar Shivaji Park ground)
Follow us
दादर परिसरातील शिवाजी पार्क मैदानात पावसाळ्यात 6 ते 7 फूटांपेक्षा अधिक गवत वाढले आहे. या वाढलेल्या गवतात मोठ्या प्रमाणात सापांचा वावर असल्याचं बोललं जात होतं.
शिवाजी पार्क मैदानामध्ये क्रिकेट, फुटबॉलचा सराव केला जातो. तसेच दादर आणि आसपासच्या परिसरातील मुले या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. त्याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी मैदानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
मात्र मैदानातील गवतात सापांचा वावर होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
याबाबत खेळाडूंसह अनेक नागरिकांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी शिवाजी पार्कात धाव घेतली.
याबाबत नितीन सरदेसाईंनी पालिका प्रशासनाकडे तक्रारही दाखल केली आहे.
त्यानंतर गुरुवारी सकाळी पालिकेच्या कामगारांनी तातडीने गवत कापण्यास सुरुवात केली
त्यामुळे खेळाडूंसह रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.