…तर अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल; राजेश टोपे यांचा इशारा

'कोरोनाचा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वयंशिस्त पाळलीच पाहीजे. अन्यथा अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल’, असा सूचक इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

...तर अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल; राजेश टोपे यांचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 7:04 PM

जालना : राज्यात नोव्हेंबरपर्यंत पूर्ण अनलॉक होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसे सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on unlock ) यांनी केले होते. राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. अशातच ‘कोरोनाचा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वयंशिस्त पाळलीच पाहीजे. अन्यथा अनलॉकचा विचार आपल्याला सोडून द्यावा लागेल’, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. (so the idea of unlock has to be given up said health minister Rajesh Tope)

राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्यात हे विधान केले . ते म्हणाले की, एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. शनिवारी (10 ऑक्टोबर) एकूण अकरा हजार नवे कोरोनाग्रस्त आढळले. तर, त्याच्या दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. पण यानंतर नागरिकांनी शिस्त पाळली नाही, मास्क वापरले नाही, सोशल डिस्टंसिंग न पाळता संसर्ग पसरत राहिला, तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल. म्हणजेच कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण पुन्हा वाढेल. त्यामुळे स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. त्या अनुषंगानेच सगळ्या गोटी अवलंबून आहेत. नागरिकांकडून वेगवेगळ्या मागण्या होत आहेत. त्यावर आमचं विचारमंथन चालू असतं, पण शिस्त पाळली आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा मर्यादित राहिला तरच नागरिकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने विचार करता येईल. असे आरोग्यमंत्री म्हणाले.

आरोग्य सुविधा विचारात घेऊनच अनलॉकचा निर्णय

राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात परिस्थिती पूर्वरत होईल अशा चर्चा होत्या. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितलं की, “अनलॉक करताना राज्यातील आरोग्यसेवेची उपलब्धता लक्षात घेतली जाईल. आरोग्यसेवच्या उपलब्धतेला प्राधान्य दिले जाईल. राज्यात बेडची संख्या, डॉक्टरांची संख्या, औषधांची संख्या या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तरच अनलॉकच्या बाबतीत विचार करता येतो.” तसेच आरोग्यसेवेच्या उपलब्धतेची माहिती घेतली जात असून फ्रंट लाईनवर काम करणारे हेल्थ वर्कर्स  यांच्या याद्या मागवल्या असल्याचेही टोपे यांनी सांगितले. यामध्ये सर्वसाधारणपणे मेट्रोसिटी मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये काम करणारे फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर, पोलीस यांच्या याद्या मागवल्या आहेत.

पूर्ण अनलॉकबाबत काय म्हणाले होते राजेश टोपे?

“कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया,” असे राजेश टोपे म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क : राजेश टोपे

रेमडेसीवीर संजीवनी नाही; त्याने रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही: राजेश टोपे

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला

(so the idea of unlock has to be given up said health minister Rajesh Tope)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.