सुदाम मुंडेचा पॅरोल तातडीने रद्द करा आणि तुरुंगात टाका, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडेंची मागणी
बीडमधील बेकायदेशीपणे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. सुदाम मुंडेचा पॅरोड तातडीने रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केली आहे (Varsha Deshpande on Sudam Munde).
सातारा : बीडमधील बेकायदेशीपणे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. सुदाम मुंडेचा पॅरोड तातडीने रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केली आहे (Varsha Deshpande on Sudam Munde). तसेच सुदाम मुंडेला तातडीने तुरुंगात डांबा, असंही त्यांनी म्हटलं. आज (6 सप्टेंबर) सुदाम मुंडेच्या परळीतील रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाने धाड टाकली. तेथे सुदाम मुंडेला अटक करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील साहित्यही जप्त करण्यात आलंय.
वर्षा देशपांडे म्हणाल्या, “डॉ. सुदाम मुंडे यांना पुन्हा एकदा दवाखाना चालवताना सापडल्याने अटक झाली. ही अत्यंतिक चिंताजनक बाब आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षा झालेल्या दोषींनाही शासनाने पॅरोलवर घरी सोडले आहेत. अशावेळी असे गुन्हेगार बाहेर येऊन आपल्या घरात शांतपणे राहण्याऐवजी पुन्हा गुन्हे करत आहेत. ही चिंताजनक गोष्ट आहे. तक्रारदार आणि साक्षीदारांच्याही हा सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर लक्ष ठेवायला हवं. आरोग्य विभागालाही सुदाम मुंडे काय करतोय यावर लक्ष ठेवण्यास सांगायला हवं होतं. तसं घडलेलं दिसत नाही.”
VIDEO: स्त्रीभ्रूण हत्येतील दोषी सुदाम मुंडेला तात्काळ तुरुंगात टाका : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे#VarshaDeshpande #SudamMunde pic.twitter.com/jWJPzO84Hb
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2020
“स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई होते. ही फार चिंताजनक गोष्ट आहे. या माणसाला 10 वर्षांची शिक्षा झालीय. गर्भलिंग निदान करताना 2010 ते 12 दरम्यान त्याला पकडण्यात आलंय. त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया होऊन शिक्षाही झालेली आहे. असा डॉक्टर घरी येतो, दवाखाना सुरु करतो आणि लोकही त्याच्याकडे उपचारासाठी जातात हे फार धक्कादायक आहे. मला विशेष वाटतं की ज्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर आला. कारवाई झाली आणि शिक्षा झाली. त्यानंतरही असा डॉक्टर पुन्हा घरी येतो तेव्हा आपण डॉक्टर म्हणून त्याच्याकडे कसे जाऊ शकतो हे मला समजू शकत नाही. त्यामुळे मी लोकांना थोडं तरी सामाजिक भान ठेवण्याचं आवाहन करेल. आरोपी असे गुन्हे परत परत करतो कारण त्याला समाजमान्यता मिळते. त्यामुळे ती समाजमान्यता कुठल्याही परिस्थितीत मिळू देऊ नये,” असं वर्षा देशपांडे यांनी नमूद केलं.
“तक्रारदार आणि साक्षीदार यांच्या जीवालाही धोका”
यावेळी वर्षा देशपांडे यांनी सुदाम मुंडे प्रकरणात त्याच्याविरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्षीदार झालेल्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने या डॉक्टरवर कारवाई केली आहे. त्यांचा जामीन आता रद्द झाला पाहिजे. त्यांचा पॅरोल रद्द झाला पाहिजे. तसेच त्यांना तातडीने तुरुंगात परत पाठवले पाहिजे. त्यांचं बाहेर राहणं समाजाला घातक आहे. तक्रारदार आणि साक्षीदार यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यांची डॉक्टरकीची पदवी काढून घेतलेली आहे. अशावेळी त्यांचा दवाखाना परळीसारख्या ठिकाणी राजरोसपणे चालत असेल तर ही फारच गंभीर गोष्ट आहे.”
वर्षा देशपांडे यांनी सुदाम मुंडेवर कारवाई झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचंही कौतुक केले. “हा फक्त सुदाम मुंडेचा विषय नाही. अशापद्धतीने गंभीर गुन्ह्यातील दोषींना पॅरोल किंवा जामिनावर सोडले असेल तर त्याची कल्पना स्थानिक पोलिसांनी देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. अशा प्रकारांमुळे राज्यातील गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. लेक लाडकी अभियानाने यासाठी मोठं काम केलं आहे. मुलींची संख्या वाढणं अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे. उद्या कोरोना जाईल, पण कमी होणारी मुलींची संख्या ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर काम करावं लागेल. म्हणूनच हा दोषी डॉक्टर तुरुंगात राहणं आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना वचक राहणं ही राष्ट्रीय हिताची गोष्ट आहे. त्यामुळे सुदाम मुंडेला तातडीने तुरुंगात टाकावं,” अशी मागणी वर्षा देशपांडे यांनी केली.
संबंधित बातम्या :
शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील दोषी सुदाम मुंडेला अटक
स्त्रीभ्रूण हत्येचा कारखाना, बीडच्या सुदाम मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा
संबंधित व्हिडीओ :
Varsha Deshpande on Sudam Munde