राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. (NCP Leader Rupali Chakankar meeting)
Follow us
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडल्याचं पाहायला मिळाले.
बैठकीसाठी जमलेल्या एका हॉलमध्ये जवळपास 100 हून अधिक महिला दाटीवाटीने एकत्र जमल्याचं चित्र पाहायला मिळाले.
या बैठकीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम अगदी पायदळी तुडवला.
रुपाली चाकणकर यांच्या आजूबाजूलाही तसे पाठीमागे महिला अगदी गर्दी करुन बसल्या होत्या.
यामुळे या बैठकीत कोरोनाचे काहीही नियम पाळले गेले नाहीत.
याबाबत रुपाली चाकणकर यांना विचारले असता, त्या महिला पत्रकारांसोबत बैठकीच्या हॉलमध्ये घुसल्याचं सांगितले.