Fake News Alert | सलून, ब्युटी पार्लरबाबत ‘ती’ व्हायरल अधिसूचना फेक!

सलून, ब्युटी पार्लर, पार्क आणि तत्सम सुविधा 29 मेपासून सुरु होणार नाहीत. लॉकडाऊनच्या नियमात राज्य सरकारने कुठलेही बदल केलेले नाहीत. (Social Media Viral Fake Notification on Beauty Parlor and Saloon)

Fake News Alert | सलून, ब्युटी पार्लरबाबत 'ती' व्हायरल अधिसूचना फेक!
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 9:34 AM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात केसांना कात्री लावण्यापासून घरच्या घरी नवे लूक करण्याचे फंडे अनेकांनी आजमावले असले, तरी सलून, ब्युटी पार्लर उघडण्याची वाट अनेक जण तितकीच आतुरतेने पाहत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली अधिसूचना वाचून आनंदाच्या भरात तुम्ही तात्काळ फॉरवर्ड करणार असाल, तर जरा थांबा! कारण सलून, ब्युटी पार्लर उघडण्याबाबत माहिती देणारी अधिसूचना फेक आहे. खुद्द महाराष्ट्र सरकारने याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. (Social Media Viral Fake Notification on Beauty Parlor and Saloon)

सलून, ब्युटी पार्लर, पार्क आणि तत्सम सुविधा 29 मेपासून सुरु होणार नाहीत. लॉकडाऊनच्या नियमात राज्य सरकारने कुठलेही बदल केलेले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अधिसूचना या फेक आहेत. अशा प्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असं राज्य सरकारने ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे.

काय आहे फेक मेसेज?

“बगिचे, मैदानं, फूटपाथ अशा सार्वजनिक ठिकाणी जॉगिंग, वॉकिंग, रनिंग, सायकलिंग आणि इतर शारिरीक व्यायाम करण्यास पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. सायकलिंग करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल” अशा प्रकारच्या फेक अधिसूचना सोशल मीडियावर व्हारल झाल्या आहेत.

हेही वाचा : ब्युटी पार्लरमध्ये केस कापण्याची हौस महागात, कोल्हापुरात मालकिणीसह दोन ग्राहकांवर गुन्हा

“शुक्रवार 29 मेपासून सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे” असाही खोटा मेसेज अधिसूचनेच्या स्वरुपात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र सोशल मीडियावरील या अधिसूचना फेक आहेत. त्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. (Social Media Viral Fake Notification on Beauty Parlor and Saloon)

(Social Media Viral Fake Notification on Beauty Parlor and Saloon)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.