Solapur Corona Update | सोलापुरात 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, प्रतिबंधित क्षेत्रातही घट

सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत 158 जणांना डिस्चार्ज दिला आहे. (Solapur Corona Patient Discharge) 

Solapur Corona Update | सोलापुरात 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, प्रतिबंधित क्षेत्रातही घट
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 5:09 PM

सोलापूर : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे सोलापुरात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोलापुरात आतापर्यंत 158 जणांना कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सकारात्मक बाब घडत आहे. सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण संख्या कमी होत आहे. (Solapur Corona Patient Discharge)

सोलापूर जिल्ह्यातील पाच जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 390 वर गेला आहे. तर आतापर्यंत 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोलापुरात 12 एप्रिलला कोरोनामुळे एका किराणामालाच्या दुकानदाराचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता जवळपास सव्वा महिन्याचा काळ उलटून गेला आहे. एप्रिलच्या 12 तारखेपासून आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने कोरोनाबाधितांची संख्या 390 वर गेली आहे. यात सर्वसामान्य माणूस, डॉक्टर, नर्स, पोलीस, नगरसेवक हे कोरोनाने बाधित झाले आहेत.

यात दिलासादायक बाब म्हणजे 22 दिवसाच्या बाळाही कोरोनामुक्त झालं आहे. आतापर्यंत 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात सर्वसामान्य व्यक्तींपासून वयस्कर मंडळी, डॉक्टर, पोलिसांचा समावेश आहे. ग्रामीण पोलीस दलातील 13 पोलीस कर्मचाऱ्यांना बाधा झाली होती. त्यातील 9 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Solapur Corona Patient Discharge)

सोलापुरातील सगळ्यात मोठा हॉटस्पॉट असलेल्या तेलंगी पाछा पेठ परिसरात 56 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 32 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर शास्त्रीनगरमधील 54 रुग्णांपैकी 22 रुग्ण बरे झाले आहेत.

कुमठा नाका येथील 37 पैकी 16 रुग्ण बरे झाले आहेत. तर संतोष नगर या भागातील एक रुग्ण बाधित आढळला होता. तोही आता कोरोनामुक्त झाला आहे. बापूजी नगर या भागातील 16 पैकी 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय ग्रामीण भागात फक्त 7 रुग्ण आहेत. यात एकाही नव्या रुग्णांची वाढ झालेली नाही.

सुरुवातीच्या काळात आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण संख्या कमी होत आहे. या ठिकाणी आढळलेले रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतत आहेत. ही सोलापूरकरासाठी दिलासादायक बाब आहे. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नियोजनाला यश आलं आहे.

बाधित रुग्ण हे बरे होत असल्याची ही बाब समाधानकारक असताना मृतांच्या वाढत्या आकडेवारीबद्दल प्रशासनाला चिंता आहे. आतापर्यंत सोलापुरातील 26 मृतांमधील एका 26 वर्षीय महिलेचा अपवाद वगळता सर्व व्यक्ती हे 55 वर्षावरील आहेत. त्यामुळे 55 वर्षावरील व्यक्तींनी आता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या खबरदारीसाठी जिल्हा प्रशासन आता पुढील पावले उचलत आहे. (Solapur Corona Patient Discharge)

संबंधित बातम्या : 

वसई-विरार, नालासोपाऱ्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, एकाच आठवड्यात 112 रुग्णांची वाढ

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात सर्वाधिक 2347 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार पार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.