Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरात पहिला रुग्ण सापडून 1 महिना पूर्ण, 12 एप्रिल ते 12 मेपर्यंत किती कोरोना रुग्ण सापडले?

एक महिन्यापूर्वी 12 एप्रिल रोजी सोलापुरातील तेलंगी पाछा पेठ परिसरातील किराणा दुकानदाराच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

सोलापुरात पहिला रुग्ण सापडून 1 महिना पूर्ण, 12 एप्रिल ते 12 मेपर्यंत किती कोरोना रुग्ण सापडले?
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 5:41 PM

सोलापूर : सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून (Solapur Corona Cases Report) आज एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिन्यापूर्वी 12 एप्रिल रोजी सोलापुरातील तेलंगी पाछा पेठ परिसरातील किराणा दुकानदाराच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 12 एप्रिल ते 12 मे दरम्यान सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 275 वर पोहोचली आहे. त्यात आतापर्यंत 17 जणांचा बळी गेला आहे. तर 217 जणांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 41 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी (Solapur Corona Cases Report) संख्या सोलापूरकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ग्रीन झोन असलेल्या सोलापूर जिल्ह्यात 12 एप्रिलला पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून ते 12 मे या तीस दिवसात आता रुग्णाची संख्या 275 वर गेली आहे. सुरुवातीच्या काळात शहरातील पूर्व भागात असलेल्या तेलंगी पाछा पेठ, रविवार पेठ, जोशी गल्ली अशा पूर्वभागात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता शहरातील पश्चिम भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. बहुतांश रुग्ण हे कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.

कधी किती रुग्ण आढळले?

– सोलापूर शहरात पहिल्या आठवड्यात म्हणजे 13 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत – 15 रुग्ण

– दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 20 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत – 46 रुग्ण

– तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 27 एप्रिल ते 3 मेपर्यंत – 68 रुग्ण

– चौथा आठवडा म्हणजे 4 मे ते 10 मेपर्यंत – 52 रुग्ण

– पाचव्या आठवड्यातील पहिल्या दिवशी 11 मे रोजी – 11 रुग्ण

अशा प्रकारे रुग्णाची संख्या प्रत्येक आठवड्यात वाढत (Solapur Corona Cases Report) आहे.

सोलापुरात कोरोनाची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र, जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, आरोग्य विभागात योग्य अचूक समन्वय आणि योग्य नियोजन नसल्याची ओरड होत आहे. क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या लोकांच्या स्वॅबची चाचणी लवकर घेण्याची मागणी होत आहे. ज्याप्रमाणे रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणे आता प्रतिबंधित क्षेत्रामध्येसुद्धा वाढ होत आहे.

शहरातील पाछा पेठ, रविवार पेठ, नई जिंदगी, बापूजीनगर, शास्त्रीनगर, लष्कर, असे शहरातील 30, तर ग्रामीण भागातील घेरडी, पाटकूल, उळेगाव, ढोकबाभुळगाव, सावळेश्वर, कुंभारीतील ग्रामीण रुग्णालयाचा परिसर प्रतिबंधित करण्यात (Solapur Corona Cases Report) आले आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना युद्धात परिचारिकाच सैनिक, तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत; जयंत पाटलांचे नर्सना भावनिक पत्र

नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर

राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार

'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?.
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत.
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट.
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे.
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?.
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.