Corona : सोलापुरात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. सोलापूर शहरात दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Corona : सोलापुरात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 3:49 PM

सोलापूर : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस (Solapur Corona Update) वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. सोलापूर शहरात दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता सोलापुारतीलल कोरोनाबाधितांची (Solapur Corona Update) संख्या 12 वर येऊन पोहोचली आहे.

सोलापुरातील तेलंगी पाछा पेठ परिसरात एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यातील 42 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 42 पैकी 10 जणांचे अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. तर, उर्वरित 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या दहा पैकी एक मृत व्यक्तीच्या संपर्कातील, तर उर्वरित 9 जण संबंधित कोरोनाबाधित झालेल्या महिलेच्या संर्पकातील आहेत. लोकांनी सरकारी यंत्रणेच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा. सोशल डिस्टन्स पाळावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केलं आहे (Solapur Corona Update).

राज्यतील स्थिती काय?

महाराष्ट्रात 165 नवीन ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 3081 वर पोहोचली आहे. एकट्या मुंबईत गेल्या काही तासात 107 नव्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 2003 वर गेला आहे. तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य झाले आहे. (Maharashtra Mumbai Corona Patients Update)

मुंबईमध्ये 107, तर पुण्यात 19 नव्या ‘कोरोना’ग्रस्तांची नोंद झाली आहे. त्याशिवाय नागपूरमधील 11, ठाण्यातील 13 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पिंपरी-चिंचवड (पुणे) आणि मालेगाव (नाशिक) मध्ये प्रत्येकी चार नवे रुग्ण आढळले आहेत.

याशिवाय, नवी मुंबई आणि वसई-विरार (पालघर) मध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदनगर आणि पनवेल (रायगड) मध्ये प्रत्येकी एक नवा ‘कोरोना’ रुग्ण सापडला आहे. तर औरंगाबादेत तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Solapur Corona Update

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधित तीन हजारांच्या पार, मुंबईतच 2003 रुग्ण

Corona : औरंगाबादेत गर्भवती महिलेसह तिघांना करोना, आकडा 28 वर

बारामतीतील रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त, हिंगोलीतील पहिल्या रुग्णाचे रिपोर्टही निगेटिव्ह

Corona | उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा : नारायण राणे

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.