सहा वर्षीय मुलाचं अपहरण, 18 तासात सुटका, सोलापूर पोलिसांची कारवाई

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची सोलापूर शहर पोलिसांनी अवघ्या 18 तासात सुटका केली आहे.

सहा वर्षीय मुलाचं अपहरण, 18 तासात सुटका, सोलापूर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 11:45 AM

सोलापूर : खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची सोलापूर शहर पोलिसांनी अवघ्या 18 तासात (Solapur Police Solve Kidnapping Case) सुटका केली आहे. सोलापूर शहरात शेजारच्या मुलाला अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. सागर कृष्णप्पा गायकवाड असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव असून त्याला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे (Solapur Police Solve Kidnapping Case).

सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरात सोमवारी (9 नोव्हेंबर) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सहा वर्षीय दीपक कोळी याला ऊस देण्याचे आमिष आरोपी सागर गायकवाड याने त्याचे अपहरण केले. अपहरणानंतर सागर गायकवाड यांनी यशला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील आपल्या आजीकडे ठेवले.

दरम्यान, आपला मुलगा हरवल्यामुळे कोळी परिवारातील सदस्य चिंतेत होते. त्यांनी आपल्या मुलाचा शोधाशोध सुरु केला होता. तर इकडे आरोपीने फोन करुन त्यांच्याकडे तब्बल पाच लाखाची खंडणी मागितली.

यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर वडिलांना फोन आलेल्या फोन नंबरवरुन पोलिसांनी माहिती घेतली असता गावातील फोनवरुन फोन येत नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आरोपी सागर गायकवाड हा यशला आजीकडे ठेवून पोलिसांसमोरच निर्धास्तपणे फिरत होता. तेव्हा संशयावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर आधी त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच आपणच मुलाचं पैशांसाठी अपहरण केल्याची कबुली त्याने दिली.

त्यानंतर पोलिसांनी सागरला अटक केली आणि दीपकची सुटका करुन त्याला त्याच्या पालकांकडे सोपवलं. अवघ्या 18 तासात पोलिसांनी अपहरणाचं हे प्रकरण सोडवत एका मुलाला त्याच्या आई-वडिलांना परत केल्याने कोळी परिवारांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. पोलिसांच्या या कामगिरीचं शहरात कौतुक होत आहे.

Solapur Police Solve Kidnapping Case

संबंधित बातम्या :

नागपुरात दोन दिवसात तीन हत्या, शहरात खळबळ

उंबरगावमधील खाद्यतेल व्यापाऱ्याची हत्या; मृतदेह कुर्झे धरणात आढळला

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.