उजनी जलवाहिनीला मोठी गळती, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलवाहिनीला (Ujani Pipeline Leakage) मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी बायपास रस्त्यावर लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
सोलापूर : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलवाहिनीला (Ujani Pipeline Leakage) मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी बायपास रस्त्यावर लाखो लीटर पाणी वाया जात आहे. आधीच सोलापुरात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. दरम्यान उजनी जलवाहिनीला (Ujani Pipeline Leakage) गळती लागल्याने या जलवाहिनीतून अक्षरश: 20 ते 30 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे बाहेर येत होते.
ऑगस्ट महिना उजाडला तरीही अद्याप सोलापुरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहर धरणावर अवलंबून असलेल्या शहरांची मात्र चिंता मिटली आहे. पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनी धरणात (Ujani Dam water level) 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.
गेल्या पाऊण तासांपासून उजनी ते सोलापूरपर्यंत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला ही गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून महामार्गावरील वाहतूकही ठप्प करण्यात झाली होती. मात्र नुकतंच महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. त्यानंतर आता या जलवाहिनीच्या वरील बाजूचे वॉल बंद करुन गळती थांबवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
मात्र शेतात पेरणीसाठी अजूनही पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. जिथे पेरणी झाली, तिथे आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सात लाख लोकांना 396 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 273 चारा छावण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनाला आश्रय देण्यात आला आहे.