Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी

'सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम' अंतर्गत यावर्षीच्या चौथ्या टप्प्याचे सब्सक्रिप्शन आजपासून 10 जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवसांसाठी सुरु राहील.

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्त सोने खरेदीचा पर्याय, सरकारी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीची संधी
Follow us
| Updated on: Jul 06, 2020 | 9:49 AM

नवी दिल्ली : भारतीयांमध्ये असलेली सोने खरेदीची आवड लपलेली नाही. कोरोनाच्या संकट काळातही सोन्याच्या किमतीत वाढ सुरु आहे. केंद्र सरकारने आणलेल्या ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम’ (Sovereign Gold Bond Scheme) अंतर्गत स्वस्त सोने विक्रीचा पर्याय खुला झाला आहे. ‘शासकीय सोन्याचे बंधपत्र योजना 2020-21’ च्या चौथ्या टप्प्याचे सब्सक्रिप्शन आजपासून (सोमवार 6 जुलै) सुरु होईल, तर 10 जुलै रोजी बंद होईल. (Sovereign Gold Bond Scheme Open On July 6th)

शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ, एफडी आणि अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळेच सोन्याचे दर विक्रमी उच्चांक गाठताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आणली आहे.

आरबीआयने एप्रिलमध्ये जाहीर केले होते, की एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत सरकार सहा हप्त्यांमध्ये सरकारी सोन्याचे बंधपत्र (गोल्ड बाँड) जारी करेल. यावर्षीच्या चौथ्या टप्प्याचे सब्सक्रिप्शन आजपासून 10 जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवसांसाठी सुरु राहील.

हेही वाचा : ‘सुवर्णनगरी’ जळगावात सोन्याचा नवा उच्चांक, 50 हजार रुपये प्रतितोळा

भारत सरकारच्या वतीने ‘रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया’ हे बाँड जारी करेल. सोन्याच्या बाँडची इश्यू किंमतही प्रति ग्रॅम 4,852 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी 8 ते 12 जून दरम्यान ही किंमत प्रति ग्रॅम 4,677 रुपये होती. ऑनलाइन गोल्ड बाँड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रतिग्रॅम 50 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

सबस्क्रिप्शन सुरु होण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन कार्यालयीन दिवसासाठी ‘आयबीजेए’ने जारी केलेल्या 999 शुद्ध सोन्याच्या क्लोजिंग किंमतीच्या सरासरीनुसार निश्चित केली जाईल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करुन ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रतिग्रॅम 50 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,802 रुपये असेल. या वर्षाच्या अखेरीस सोन्याच्या किमती वाढतच राहतील, असा अंदाज आहे. यामुळे, ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम’ला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

गुंतवणूक कोण करु शकेल?

भारतात राहणारे नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंबे, विश्वस्त, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करु शकतात. या बाँडमध्ये किमान एक ग्रॅम गुंतवणूक केली जाऊ शकते. एखादी व्यक्ती किंवा हिंदू अविभाजित कुटुंब आर्थिक वर्षात या योजने अंतर्गत चार किलोपर्यंत गुंतवणूक करु शकते. ट्रस्टसारख्या संस्था आर्थिक वर्षात 20 किलोपर्यंत गुंतवणूक करु शकतात. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा कालावधी आठ वर्षांचा आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरु केली गेली.

(Sovereign Gold Bond Scheme Open On July 6th)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.