मुंबई : अभियंता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या एस. पी. बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) यांनी हौशी गायक म्हणून आपल्या संगीत कारकीर्दीला सुरुवात केली होती. दक्षिणात्य संगीतातील या प्रवासात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. ८ फेब्रुवारी, १९८१ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ अशा बारा तासांत तब्बल २१ कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये (Guinness Book of World Records) आपले नाव कोरले. या आधी त्यांनी एका दिवसांत १९ तमिळ गाणी तर, १६ हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. ते इतके व्यस्त होते की, दिवसाला १५-१६ गाणी ते रेकॉर्ड करतच! याशिवाय ते मोठ्या कलाकारांसाठी डबिंगही करत (SP Balasubrahmanyam Guinness World Record).
एस. पी. बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. एखादे गाणे कठीण वाटल्यास ते ८-१० दिवसांचा वेळ मागून सराव करत. मात्र घाईचे काम असल्यास ते सहजपणे नकार देत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून ‘विश्राम’ घेतला होता. २०१३ मध्ये आलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी त्यांनी मुख्य गाणे गायले होते.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. याच दरम्यान तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक बालचंदर एका हिंदी चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी एस. पी. बालासुब्रमण्यम यांची निवड केली. चित्रपट होता ‘एक दुजे के लिये’. विशेष म्हणजे हा चित्रपट कमल हसन, रति अग्निहोत्री, एस. पी. बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) या तीनही दाक्षिणात्य कलाकारांचा पहिला हिंदी चित्रपट होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी चित्रपटाचे संगीत तयार केले होते (SP Balasubrahmanyam Guinness World Record).
मात्र, दाक्षिणात्य आवाज या चित्रपटासाठी वापरावा यावर त्यांचे दुमत होते. परंतु, एस. पी. बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) यांच्या आवाजाने ते इतके भारावून गेले की त्यांनी गायक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. प्रदर्शनानंतर चित्रपट आणि गाणी दोन्हींना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘एक दुजे के लिये’ या पहिल्याच हिंदी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशातल्या, नेल्लोर येथील मूलपेट मेहुआमध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरिकथा कलाकार होते. हरिकथा हा आंध्र प्रदेशातील एक पारंपरिक कला प्रकार असून, यात कथा, कविता, नृत्य, नाटक अशा सगळ्या कला यात अंतर्भूत असतात. धार्मिक कथा या कलाप्रकारातून सादर केल्या जातात. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे वडील याच नाटकांतून काम करायचे. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असून, त्यातील एक बहिण एस.पी.शैलजा यासुद्धा गायिका आहेत.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 25 September https://t.co/wlFtMC09sE
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
संबंधित बातम्या :
दाक्षिणात्य ‘रफी’ अशी ओळख मिळवणाऱ्या एसपींना बनायचे होते ‘इंजिनीअर’!
सूरांचा बादशाह हरपला, ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन
(SP Balasubrahmanyam Guinness World Record)