स्पेशल रिपोर्ट : सोलापुरात कोरोनाची एन्ट्री नेमकी कशी झाली?

कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव करु नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, आरोग्य विभाग रात्रीचा दिवस करत (Solapur Corona Virus Spread) होते.

स्पेशल रिपोर्ट : सोलापुरात कोरोनाची एन्ट्री नेमकी कशी झाली?
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 6:48 PM

सोलापूर : राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ सुरु असताना (Solapur Corona Virus Spread) सोलापूर जिल्हा मात्र कोरोनामुक्त होता. मात्र या जिल्ह्यात 11 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 37 वर पोहोचली आहे. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनांकडून रात्रीचे दिवस केले जात आहेत. त्याशिवाय सोलापुरात कोरोनाची एन्ट्री नेमकी कशी झाली याचाही शोध घेतला जात आहे.

सोलापूर शहराच्या शेजारी असणाऱ्या उस्मानाबाद, पुणे आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथे (Solapur Corona Virus Spread) कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. मात्र सोलापूर जिल्हा हा सगळ्यात सुरक्षित जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला होता. कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव करु नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, आरोग्य विभाग रात्रीचा दिवस करत होते. मात्र 12 एप्रिलला एका 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर मृत किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची पाहणी केली असता तिच्या मुलासह घरातल्या इतरांना कोरोना झाल्याचे समोर आलं.

तर दुसरीकडे ठाण्याहून होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला पोलीस कर्मचारी सोलापुरात दाखल झाला. त्याच्या उपचारादरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर इंदिरानगरमधील एका 79 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सोलापुरात 9 हॉटस्पॉटमधील 37 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात तीन मृत व्यक्तींचाही समावेश आहे.

कोणतीही ट्रव्हल हिस्ट्री नसलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचा धोका आहे. पण सोलापुरात मात्र 56 वर्षीय किराणा दुकानदार, 69 वर्षीय वृद्ध महिला, मोदीखाना परिसरातील 75 वर्षीय व्यक्तीचा अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या तिघांनीही कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे समोर आलं आहे. मात्र तरीही त्यांना कोरोनाने गाठलं. आता सिव्हिल हॉस्पीटलमध्ये जवळपास 34 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र सोलापुरात कोरोनाचा संसर्ग कसा आला याचा शोध लागला नाही.

सध्या सोलापुरातील तेलंगी पाछा पेठ, इंदिरानगर, बापूजीनगर, अयोध्या नगरी, कुर्बान हुसेन नगर, भद्रावती पेठ, रविवार पेठ, इंदिरानगर, मोदीखाना, शनिवार पेठ, मदर इंडिया झोपटपट्टी असे आता हॉटस्पॉट बनले आहेत.

27 एप्रिलपासून विशेष संचारबंदी

ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तिथला संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. आतील व्यक्तींना बाहेर तर बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश दिला जात नाही. कोरोनाचा शिरकाव कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप प्रशासनाच्या हाती काहीही लागलं नाही. काही नागरिक आपली माहिती लपवत असल्याचं समोर येत आहे. यासाठीच आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील कोरोनाचा शिरकाव कसा झाला यावर सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.

सोलापुरात वस्त्रोद्योग आणि विडी उद्योग असे दोन प्रमुख उद्योग आहेत. या दोन्हीही क्षेत्रावर सुमारे दीड लाख कामगारांची उपजीविका चालते. विशेष म्हणजे हे दोन्हीही उद्योग शहर हद्दीतच आहेत. कारखाने आणि कामगार बहुल भागात कोरोना रुग्णाची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोलापूर आता रेड झोन मध्ये गेला आहे.

लॉकडाउन दोन मार्गदर्शक तत्वानुसार औदयोगिक उत्पादन सुरु करण्यासाठी आता अडचणी येणार आहेत. त्यामुळे दीड लाखाहून अधिक कामगारांना आता घरीच बसावं लागणार आहे. तर सोलापूरकरांनी कोरोना युद्धाशी सामना करण्यासाठी येत्या 27 तारखेपर्यंत विशेष संचारबंदी लागू करण्यात आली (Solapur Corona Virus Spread) आहे.

संबंधित बातम्या : 

महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ड्युटीवरील पोलिसाला कोरोना झाल्यास 10 हजार रुपयांची मदत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुढाकार

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.