स्पेशल रिपोर्ट: डोकलामचा मुद्दा 73 दिवस ताणणारं चीनी सैन्य लडाखमध्ये फक्त 7 दिवसातच का नरमलं?

डोकलामचा मुद्दा 73 दिवस ताणून धरणारं चीनी सैन्य लडाखमध्ये फक्त 7 दिवसातच का नरमलं? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत (Effect of India China Tension on China).

स्पेशल रिपोर्ट: डोकलामचा मुद्दा 73 दिवस ताणणारं चीनी सैन्य लडाखमध्ये फक्त 7 दिवसातच का नरमलं?
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 3:02 PM

मुंबई : डोकलामचा मुद्दा 73 दिवस ताणून धरणारं चीनी सैन्य लडाखमध्ये फक्त 7 दिवसातच का नरमलं? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत (Effect of India China Tension on China). यावर संरक्षणविषयक तज्ज्ञ चीनी सरकारचे सर्व फासे उलटे पडल्यानेच चीनने नरमाईची भूमिका घेतल्याचं सांगत आहेत. चीनच्या सरकारला देशांतर्गत अराजकतेची भीती वाटू लागली आहे. चीन सरकारविरोधात तेथील जनतेत असंतोष धगधगतो आहे. विशेष म्हणजे जिनपिंग यांचा राजीनामा मागणाऱ्या एका कवीला तुरुंगातही टाकलं गेलंय.

जागतिक घडामोडींच्या तज्ज्ञांच्या मते, “कोरोनामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे चीनमधील बेरोजगारीचा दर वाढलाय. अमेरिकेने चीनी विद्यार्थ्यांवर बंदी घातलीय. ब्रिटननं चीनी कंपन्यांना बहिष्काराची धमकी दिलीय. भारतानं चीनी कंपन्यांना गुंतवणुकीआधी परवानगीची अट घातलीय. अफ्रिकन देश सुद्धा ‘बायकॉट चीन’ बोलू लागले आहेत. या सर्व मुद्द्यांवरुन चीनी लोकांची जगभर छि-तू होतेय.”

चीनमधील लोकांच्या मनात स्वतःच्या सरकारविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, त्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच चीननं राष्ट्रवादाचा मुद्दा उभा करुन शेजारच्यांना डिवचणं सुरु केलंय, असाही आरोप होत आहे. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी चीननं जपान नजीकच्या काही बेटांजवळ पाणबुडी पाठवली होती. मात्र, जपानच्या नेव्हीनं दणका दिल्यानंतर चीनला माघारी फिरावं लागलं. दोन दिवसांपूर्वी तैवानला धमकावण्यासाठी त्यांच्या हद्दीत चीनची लढाऊ विमानं शिरली. मात्र, तैवानच्या वायुदलानंही चीनला पळवून लावलं. त्यानंतर भारताच्या गलवान घाटीत चीननं घुसखोरी केली. मात्र, भारतीय जवानांनी याला चोख उत्तर दिल्यानं चीनवर आता तिथूनही मागे फिरण्याची वेळ आलीय.

एकूणच कोरोनाला दाबण्यासाठी चीनकडून राष्ट्रवादाचं कार्ड वापरलं जातंय. मात्र, चीनचा हा सर्व डाव चीनवरच उलटला. रशियाला भारताविरोधात करण्याचा डावही फसला. पाकिस्तानला कर्ज देऊनही अमेरिकेच्या भीतीमुळे पाकिस्ताननं तोंड उघडलं नाही. यामुळे स्वतःच्या ज्या परदेश धोरणावर चीनला माज होता, तोच माज फक्त 7 दिवसात उतरल्याचं बोलल जात आहे. आजच्या घडीला भारताकडून 5 देश बोलले आहेत. मात्र, अधिकृतपणे अजून एकाही देशानं चीनचं समर्थन केलेलं नाही. त्यात दुष्काळात तेरावा महिना काय असतो, याचीही चीनला प्रचिती येतेय. कारण, नेपाळला हाताशी धरुन चीन भारताला घेरायला गेला. मात्र, स्वतः चीनचं सरकार तिहेरी जाळ्यात सापडलं. कोरोना, सीमेवरची माघार आणि चीनमध्ये आलेला महापूर अशा या तीन आघाड्यांवर चीनच्या हाती निराशा आली आहे.

कोरोनानं बेरोजगारी वाढवलेली असताना महापुरानं चीनमध्ये मोठं नुकसान केलंय. शेतं पाण्याखाली आहेत. अनेक उद्योग बुडाले आहेत. हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलंय. चीनमधल्या पुराच्या पूर्ण घडामोडी बाहेर येत नसल्या तरी एका माहितीनुसार मागच्या 70 वर्षातला चीनमधला हा सर्वात मोठा महापूर आहे. त्यात भर म्हणजे नेमक्या याच काळात बिजिंगमध्ये कोरोना पसरलाय. बिजिंगचे अनेक भाग लॉकडाऊन केले गेलेत. बिजिंग हे चीनच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. जर ते फार काळ बंद राहिलं, तर चीनमध्ये बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहणार आहेत.

विशेष म्हणजे ज्या दीडशे देशांना चीननं कर्ज वाटून ठेवलंय, त्यापैकी अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोरोनामुळे बुडण्याच्या काठावर आहेत. एका माहितीनुसार सध्या जागतिक बँकेनं जितकं कर्ज दिलेलं नसेल, त्याहून जास्त कर्ज एकट्या चीननं वाटून ठेवलंय. पाकिस्तान, कजाकिस्थान सारख्या देशांनी तर कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याचं सांगून आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जगाचं नेतृत्व करु पाहणाऱ्या चीनच्या सरकारला सध्या आपल्या देशातच स्वतःच्या नेतृत्वाची चिंता भेडसावतेय.

संबंधित बातम्या :

चीनने भारतीय वाघांना डिवचलं, भारत-चीन वादावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिक्रिया

चीनला 1126 कोटींचा झटका देण्याची भारताची तयारी, RRTS प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

India China Face Off | भारत-चीन संघर्ष वाढला, भारतापुढे आता कोणते मार्ग?

Effect of India China Tension on China

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.