SRH vs RR: हैदराबादकडे एकापेक्षा एक चांगले खेळाडू, रॉयल्सच्या दमदार खेळाडूंना रोखू शकेल सनरायझर्स?
IPL च्या 15 व्या हंगामातील पाचवा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. जाणून घ्या दोन्ही संघाच्या कामगिरीविषयी, जाणून घ्या दोन्ही संघाच्या मजबूत फलंदाज आणि गोलंदाजांविषयी.
मुंबई : IPL च्या (IPL 2022) 15 व्या हंगामातील पाचवा सामना आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सने 2008मध्ये पहिल्या IPL मध्ये विजेतेपद पटकावले होते. पण त्यानंतर संघाला ही कामगिरी करता आली नाही. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये 15 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या 15 सामन्यांपैकी सनरायझर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सला 7 सामन्यात यश मिळाले आहे. गेल्या मोसमात दोघांमध्ये 2 सामने झाले. ज्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला. सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर सनरायझर्सची राजस्थानविरुद्धची सर्वोच्च 201 धावा काढल्या होत्या. तर राजस्थानने सनरायझर्सविरुद्ध सर्वाधिक 220 धावा केल्या होत्या. दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडे यंदा चांगलेच दमदार खेळाडू आहे.
रॉयल्सचा संघ खूप मजबूत
हैदराबादचंही पारडं जड
सनरायझर्स हैदराबादकडेही एकापेक्षा एक चांगले खेळाडू आहेत. राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि केन विल्यमसनसह संघाकडे चांगली फलंदाज आहेत. याशिवाय मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे चांगले गोलंदाजही आहेत. हैदराबाद कोणत्या गोलंदाजांसह आता मैदानात उतरणार हे पहावं लागेल.
रॉयल्स जेतेपदाच्या शोधात
मागील हंगामात 2018 चा चॅम्पियन राजस्थान गुणतालिकेत 7 व्या तर 2016 चा चॅम्पियन हैदराबाद 8 व्या क्रमांकावर होता. रॉयल्सने 2008 मध्ये त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. परंतु तेव्हापासून संघ कधीही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. राजस्थान रॉयल्स गेल्या काही काळापासून सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. आता संघाला मैदानावर ताकद दाखवायची आहे. कर्णधार संजू सॅमसनने दरवर्षी एक-दोन सामन्यांत चांगला खेळ केला आहे. पण रॉयल्सला दुसरे विजेतेपद मिळवायचे असेल तर त्यांना कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. यामुळे सॅमसनला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याची संधी मिळेल. जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल रॉयल्ससाठी डावाची सुरुवात करू शकतात. बटलर कोणत्याही आक्रमणाला झुगारून देण्यास सक्षम आहे. पडिक्कलसह तो रॉयल्सला दमदार सुरुवात करून देऊ शकतो, ज्यामुळे सॅमसनसारख्या खेळाडूसाठी ते सोपे होईल. मधल्या फळीत, रॉयल्सकडे पॉवर हिटर शिमरॉन हेटमायर, रसी व्हॅन डेर ड्युसेन, जिमी नीशम आणि रियान पराग आहेत. त्याचे योगदान संघासाठी खूप महत्त्वाचे असेल.
हेड टू हॅट
एकूण सामने: 15 सनरायझर्स हैदराबाद: 07 राजस्थान रॉयल्स: 08
सनरायझर्स हैदराबाद टीम
केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, श्रेयस गोपाल.
राजस्थान रॉयल्स टीम
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवी अश्विन, ओबेद मॅककॉय, ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा, युझवेंद्र चहल.
इतर बातम्या
उड्या तर मारून दाखवणारच! लहान मुलांच्या Bouncy Castleमध्ये कसा घुसतो तरूण? हसवणारा Viral video पाहा
आदेश भावोजी देणार ११ लाखांची पैठणी; महामिनिस्टर पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला