Sri Lanka Cabinet | मोठा भाऊ पंतप्रधान, धाकटा राष्ट्रपती, एकाच घरात चार मंत्रिपदं, श्रीलंका सरकारचं मंत्रिमंडळ
महिंद्रा राजपक्षे हे स्वतः पंतप्रधान आहेत. पंतप्रधानाबरोबर त्यांच्याकडेच वित्त, शहर विकास आणि बौद्ध धर्माशी संबंधित विभागाचं खातं आहे.
कोलंबो : श्रीलंकेत एक कुटुंब आणि 8 मंत्रिपदं, मोठा भाऊ पंतप्रधान, (Sri Lanka Cabinet) धाकटा भाऊ राष्ट्रपती, मोठ्या भावाचा मुलगा क्रीडा मंत्री, तर लहान भावाचा मुलगा देशांतर्गत संरक्षण मंत्री झाला आहे. हे श्रीलंका सरकारचं नवनिर्वाचित मंत्रिमंडळ आहे (Sri Lanka Cabinet).
लंकापती रावणाच्या थाटमाटालाही लाजवणारं हे वैभव राजपक्षे कुटुंबाच्या वाट्याला आलं आहे. अख्खी लंका रावणाची होती. मात्र, रावणातल्या दरबारी मंत्र्यांमध्ये सुद्धा वैविध्य होतं. पण, यंदाच्या निवडणुकीनंतर श्रीलंका देश हा राजपक्षे प्राईव्हेट लिमिटेड झाल्याची शंका येतं आहे.
– महिंद्रा राजपक्षे हे स्वतः पंतप्रधान आहेत. पंतप्रधानाबरोबर त्यांच्याकडेच वित्त, शहर विकास आणि बौद्ध धर्माशी संबंधित विभागाचं खातं आहे.
– गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानाचे धाकटे भाऊ आहेत. पण राष्ट्रपतीपदाबरोबरच गोटाबाया राजपक्षेंनी स्वतःकडे संरक्षण खातं सुद्धा ठेवलं आहे (Sri Lanka Cabinet).
– नमन राजपक्षे हे युवक कल्याण मंत्री आहेत. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचे पुत्र आहेत. युवक कल्याणबरोबरच क्रीडा मंत्रालय सुद्धा नमन राजपक्षेंनाच दिलं गेलं आहे.
– चमल राजपक्षे हे राजपक्षे कुटुंबातली अजून एक फांदी. त्यांनाही देशांतर्गत सुरक्षेचं खातं मिळालं आहे.
– शिषेंद्र राजपक्षे हे चमल राजपक्षे यांचे पुत्र आहेत. यांच्या वाट्यालाही एक राज्यमंत्री पद आलं आहे.
हे मंत्रिमंडळाचं वाटप झालं? की एखाद्या मोठ्या खटल्यातल्या शेतीची वाटणी, याबाबत अनेकांना संभ्रम आहे. एकाच घरात आठ मंत्रिपदं, म्हणजे उद्या हे कुटुंब घरी संध्याकाळच्या जेवणाला जरी बसलं, तरी घरच्या-घरी कॅबिनेट मिटिंग उरकेल. ना कॅबिनेटमधले मतं-मतांतरं आडवे येतील आणि ना ही एकमेकांविषयी स्पर्धा रंगेल.
श्रीलंकेची लोकसंख्या जेमतेम दोन कोटींच्या घरात आहे. म्हणजे जवळपास आपल्या गोव्या राज्याइतकी पण राजपक्षे कुटुंबाने अख्खे सरकार प्रायव्हेट लिमिटेड का केलं. त्यामागचं कारण म्हणजे प्रचंड बहुमत.
श्रीलंकेत एकूण 225 जागा आहेत. त्यापैकी राजपक्षेंच्या कुटुबानं तब्बल 145 जागा जिंकल्या. विरोधी पक्ष औषधालाही उरला नाही. जर पाठिशी राक्षशी बहुमत असेल. तर घराणेशाहीच्या तलावारीत लोकशाही म्यान करता येते. याचं श्रीलंका हे चांगलं उदाहरण आहे.
US Election : अमेरिकेच्या निवडणुकीत इतिहास, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारीhttps://t.co/JpiZijkipm#USElection #America #KamalaHarris #JoeBiden@KamalaHarris @mayaharris_ @JoeBiden
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2020
Sri Lanka Cabinet
संबंधित बातम्या :
रशियाची कोरोना लस Sputnik V भारतात येण्यास वेळ लागण्याची शक्यता, नेमकं कारण काय?