मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेला रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला एनसीबीने या दोघांना एनसीबीने काल (4 सप्टेंबर) अटक केली होती. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. (Showik Chakraborty And Samuel Miranda In NCB custody till 9 September)
Mumbai: Showik Chakraborty and Samuel Miranda brought to Esplanade Court by officials of the Narcotics Control Bureau pic.twitter.com/BNz46PXEaP
— ANI (@ANI) September 5, 2020
तर न्यायालयाने ड्रग पेडलर कैजानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तीनही आरोपींना चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेले जाणार आहे. यावेळी आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. ड्रग्स कोणी खरेदी केले? यासाठी पैसे कोण देत होते? किती पैसे दिले गेले? किती ड्रग्ज खरेदी करण्यात आले? यासर्व गोष्टींची चौकशी केली जाईल. तसेच रियाचा याप्रकरणी काय संबंध होता? याचीही चौकशी केली जाणार आहे.
Mumbai: Narcotics Control Bureau seeks 7-day custody of Showik Chakraborty & Samuel Miranda, also seeks judicial custody of Kaizen Ibrahim
Showik Chakraborty & Samuel Miranda are being presented before the Esplanade Court, in connection with Sushant Singh Rajput death case https://t.co/wiNNzWRVa1
— ANI (@ANI) September 5, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने कैजानची कोठडी मागितलेली नाही. याआधी कोर्टाने ड्रग पेडलर जैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यामुळे सध्या शोविक, सॅम्युअल मिरांडा, जैद विलात्रा, अब्दुल बासित परिहार हे चौघेजण एनसीबीच्या कोठडीत आहेत.
तसेच उद्या (6 सप्टेंबर) रिया चक्रवर्तीला एनसीबीने चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. यावेळी रिया, शोविक आणि सॅम्युअल या तिघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे. (Showik Chakraborty And Samuel Miranda In NCB custody till 9 September)
Today we have obtained the police custody remand of two more persons so that makes four people in our custody remand: Mutha Ashok Jain, Deputy DG, South-Western Region, NCB #SushantSingRajputCase pic.twitter.com/3rTfgoDDVz
— ANI (@ANI) September 5, 2020
एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “मी याप्रकरणी जास्त काही सांगू शकत नाही. एनसीबी या प्रकरणी आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय कनेक्शनवर लक्ष देत आहे. शोविक आणि सॅम्युल या दोघांना चौकशीसाठी कोठडीत घेण्यात आले आहे. त्यासोबत या प्रकरणी इतर लोकांनाही चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे.”
? कसे आहे ड्रग कनेक्शन ?
➡️28 ऑगस्टला अब्बास रमजान लखानीला अटक
➡️21 वर्षीय लखानीकडून 46 ग्रॅम गांजा जप्त
➡️लखानीच्या माहितीवरुन कर्ण अरोराला अटक
➡️कर्ण अरोराकडून 13 ग्रॅम गांजा जप्त
➡️लखानी आणि अरोराच्या माहितीवरुन झैद विलात्रास अटक
➡️झैदकडून 9 लाख 55 हजार 750 रुपये रोख रक्कम जप्त
➡️झैदकडून 2081 डॉलर्स, 180 पौंड, 15 दिनार चलन जप्त
➡️सर्व रक्कम ड्रग्ज विक्रीची असल्याची झैदची कबुली
➡️अब्देल बासित परिहारला झैदच्या माहितीवरुन अटक
➡️झैद आणि कैझान इब्राहिमकडून परिहार गांजा घ्यायचा
➡️परिहार शौविक चक्रवर्तीसाठी गांजा खरेदी करायचा
➡️परिहार शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला ड्रग्जही द्यायचा
➡️परिहारच्या स्टेटमेंटवरुनच शौविकला समन्स पाठवून अटक
NCB कोठडी घेऊन काय करणार ?
1) शौविक आणि अटकेतल्या इतरांची एकत्र चौकशी करणार
2) ड्रग्ज व नार्कोटिक्सच्या खरेदी-विक्रीचे नेटवर्क शोधणार
3) शौविकची रिया व दिपेश सावंतला घेऊन एकत्रित चौकशी
4) ड्रग्ज खरेदीसाठीचे आर्थिक व्यवहार तपासून पाहणार
5) CDR,वॉट्सअप चॅट व चौकशीतील नावांची खातरजमा करणार
6) CDR मधील फरार व्यक्तींचा शोध घेणार
हेही वाचा –Kangana Ranaut | मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली आहे. सुशांत सिंह प्रकणात ड्रग्जचे धागेदोरे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने मोठी कारवाई करत रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली होती. भावाच्या अटकेनंतर आता रियाच्या अडचणीही वाढणार आहेत. एनसीबी रियालाही समन्स बजावण्याची शक्यता आहे.
सुशांत प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या एनसीबीने आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतलं. त्यापैकी 2 जणांना जामीन मिळाला आहे. इतरही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना एनसीबी समन्स पाठवण्याची शक्यता आहे. (Showik Chakraborty And Samuel Miranda In NCB custody till 9 September)
संबंधित बातम्या :
सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक
सीबीआयच्या चौकशीत रिया-शौविक ड्रग्ज सेवन करत असल्याचा दावा, श्रुती मोदीला एनसीबीच्या समन्सची शक्यता