मुंबई – सध्या ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका एक वेगळा मोड घेत असल्याने चाहत्यांना प्रत्येकवेळी आता नवीन होणार अशी उत्सुकता लागलेली असते. सध्याच्या घडीला सगळ्या मालिकांच्यामध्ये अधिक पसंती असलेली ही मालिका आहे. त्या मालिकेती अरूंधती (Arundhati) हे पात्र अनेक महिलांना आपलं पात्र असल्यासारखं वाटतं असल्याने त्यांनी महिला वर्गाने अरूंधतीला अक्षरश: डोक्यावर घेतलंय. अनेकजण ही मालिका पाहत असतात, ही मालिका अनेक पुरूषही आवर्जुन पाहत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. मालिकेत दाखवण्यात आलेलं अरूंधतीचं साधेपण अनेक महिलांना आपलं स्वत:चं असल्याचं जाणवतं. त्यामुळे ही मालिका महिलांना अधिक पसंतीला उतरली आहे. सध्या महिलांची लाडकी अरूंधती बदलताना दिसतं आहे. तिच्या राहणीमानात अनेक बदल होत असल्याने अरूंधती घरच्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. देशमुखांच्या (deshmukh) घरात सुरू झालेला वादात आणखी नवं काय पाहायला मिळतंय याकडे सगळ्याचे डोळे लागलेले आहेत.
देशमुखांच्या घरात का आहे वादळ ?
अरूंधतीमध्ये झालेला बदल घरच्यांना आवडलेला नाही असं मालिका पाहिल्यानंतर वाटतंय. कारण ती नेहमी साडीत असायची आता पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळत असल्याने तिच्या घरच्यांना ही बाब खटकायला लागली आहे. ती एका गाण्याच्या शुटिंगला जाते घरी येताना आल्यानंतर तिचा पंजाबी ड्रेस पाहून घरच्यांना एकदम धक्का बसतो. त्यामुळे अरूंधतीचा नवरा अनिरूध्द ड्रेस घालण्यावर आणि अरूंधती मित्र आशुतोष केळकरसोबत राहण्यावर आक्षेप घेतो. नव-याने असं म्हणाल्यावर अरूंधती मनातून पुर्णपणे दुखावते तसेच तात्काळ देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे अरूंधतीच्या सासुला देखील तिने ड्रेस घातलेला आवडत नाही. अरूंधती म्हणते माझ्या मुलांच्यासमोर माझ्या चरित्र्यावर संशय घेतला जातोय हे योग्य त्यामुळे ती घर सोडण्याचा निर्णय घेते.
सासू सुनेचं नातं संशयीच?
‘आई कुठे काय करते‘ या मालिकेत आपण अनेकदा सासू आणि सुनेचं यांच्याआगोदर चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळाले. परंतु सध्या देशमुखांच्या घरात भांडण सुरू असून नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अरूंधती ज्यावेळी पहिल्यांदा पंजाबी ड्रेस घालून देशमुखांच्या घरी जाते. त्यावेळी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो हे आपण पाहिले आहे. तसेच पंजाबी ड्रेस घातल्याचे अरूंधतीने सासुबाईना मोठा धक्का बसतो. तसेच त्या अरूंधतीकडे संशयाच्या नजरेने बघत असतात. अनिरूध्द ज्यावेळी अरूंधतीला तिच्या मित्रासोबत जायचं नाही आणि पंजाबी ड्रेस घालायचे नाहीत असं म्हणतो, त्यावेळी तो संशय घेऊन बोलत असल्याचे अरूंधतीच्या लक्षात येते. अरूंधतीच्या सासूला देखील पंजाबी ड्रेस आणि मित्रासोबत बाहेर गेल्याचं चांगलचं खटकलं आहे. त्यामुळे त्यांच्याही मनात संशयाची सुई तयार झाल्याची पाहायला मिळते.