राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार, अजित पवारांची घोषणा

अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनसह राज्याच्या अर्थचक्राबाबत भाष्य केलं. राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार, अजित पवारांची घोषणा
Follow us
| Updated on: May 29, 2020 | 1:28 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पीसीएनटीडी तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन झाले. गेल्या तीन महिन्यांपासून पूल तयार असूनही, तो उद्धाटनाअभावी वापराविना रखडला होता. अखेर आज अजित पवारांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनसह राज्याच्या अर्थचक्राबाबत भाष्य केलं. राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे, असं अजित पवार म्हणाले. (state government will announce the finance package said Ajit Pawar)

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या पातळीवर कोरोना रोखण्याचे प्रयत्न करत आहे. शहरी भागातून स्थलांतर झाल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पण खबरदारी घेतली तर घाबरण्याचे कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनबाबत अंदाज आणि राज्याचं पॅकेज यावेळी अजित पवारांनी लॉकडाऊनबाबत अंदाज व्यक्त करताना राज्य सरकार पॅकेज जाहीर करणार असल्याच सांगितलं. ते म्हणाले, “आज लॉकडाऊनबद्दल भारत सरकार काय निर्णय घेतंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतीलच. पण माझ्या अंदाजाने वेगवेगळ्या राज्यांवर ते जबाबदारी देण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अडीच महिन्यापासून सर्व कामकाज ठप्प आहे. यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यावर आपल्याला मार्ग काढायचा आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल. केंद्राकडून 21 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले, पण प्रत्येक राज्यातील जनतेच्या हातात प्रत्यक्षात किती मदत येणार याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही म्हणतात हे नुसते मोठे आकडे पहायला मिळाले. गरीब जनतेलाही मदत मिळायला हवी, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करतोय”.

मराठी माणसाने पुढे यावे परराज्यातील मजुरांची वाट पाहतोय, पण आपल्या राज्यातील मागासलेल्या भागातील जनतेने त्यांची जागा घ्यायला हवी. राज्य सरकार स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठी माणसाने पुढे यावे.

आषाढी वारी आषाढी वारी सोहळा हा भावनेचा प्रश्न आहे. अनेक वर्षांचा हा इतिहास आहे. वारकऱ्यांच्या भावनाही जपल्या जातील पण कोरोनाच्या संकटाला नजरेसमोर ठेऊनच हा निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

केंद्राने असो, राज्याने असो की स्थानिक प्रशासनाने असो यांनी एकमेकांवर ढकलाढकली करण्यापेक्षा हे जगावरचे संकट आहे. हे लक्षात ठेऊन आपण एकजुटीने याचा सामना करतोय असाच संदेश समाजात जायला हवा, असं अजित पवारांनी परराज्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबतच्या प्रश्नावर भाष्य केलं.

या गोष्टीत राजकारण आणू नये. कोणाला काय वाटतं याची आज फिकीर करायची गरज नाही. जनता या कोरोनाच्या संकटातून बाहेर कशी पडेल आणि सुरक्षित कशी राहील याला आम्ही अग्रस्थानी ठेवलेलं आहे, असं अजित पवारांनी नमूद केलं.

(state government will announce the finance package said Ajit Pawar)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.