Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हत्येनंतर जाळण्यासाठी घराच्या समोरच 5 पोलिसांचे मृतदेह रचले, चौकशीत गँगस्टर दुबेची कबुली

8 पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याने मोठा खुलासा केला आहे (Statement of Kanpur Encounter Accuse Vikas Dubey).

हत्येनंतर जाळण्यासाठी घराच्या समोरच 5 पोलिसांचे मृतदेह रचले, चौकशीत गँगस्टर दुबेची कबुली
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 8:07 PM

लखनौ : कानपूरमध्ये 8 पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याने मोठा खुलासा केला आहे (Statement of Kanpur Encounter Accuse Vikas Dubey). पोलिसांच्या हत्येनंतर त्यांचे मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचंही नियोजन असल्याची कबुली आरोपी विकास दुबे याने दिली. आरोपी दुबेने पोलिसांच्या हत्येनंतर घराच्या समोरच 5 पोलिसांचे मृतदेह एकावर एक ठेवले. त्यानंतर हे मृतदेह जाळण्याचं ठरलं मात्र तसं करता आलं नाही. पोलिसांच्या हत्येनंतर आरोपी विकास दुबेला फरार होता, त्याला आज मध्य प्रदेशमधील उज्जैनमधून बेड्या ठोकण्यात आल्या. (Kanpur Encounter Accuse Vikas Dubey Arrested)

आरोपी दुबेने पोलिसांची हत्या केल्यानंतर आपल्या घरासमोरच मृतदेह एकावर एक ठेवले. त्यानंतर हे मृतदेह जाळण्यासाठी घरात पेट्रोलचाही साठा करण्यात आला होता. मात्र, पोलिसांचे मृतदेह एका जागेवर जमा केल्यानंतर ते जाळण्यासाठी आरोपींना शक्य झालं नाही. त्याआधीच पोलिसांनी घटनास्थळावर कारवाईला सुरुवात केली. पोलिसांची वाढलेली कुमक पाहून आरोपी दुबे तात्काळ घटनास्थळावरुन फरार झाला. यावेळी त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

विकास दुबेने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं, “पोलिसांच्या कारवाईनंतर गावातून बाहेर पडल्यावर अनेक सहकारी जिकडे शक्य झालं तिकडे गेले. पोलीस आमच्यावर पहाटेच्या वेळी कारवाई करतील अशी आम्हाला माहिती मिळाली होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच रात्रीच्या वेळी छापा टाकला. त्यामुळे आम्ही सर्वांचं जेवण तयार केलेलं असतानाही खाता आलं नाही.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

या घटनेनंतर आरोपी दुबेचा मामा पोलीस चकमकीत मारला गेला. तो जेसीबी मशीनचं काम करायचा. मात्र, चकमकीच्या दिवशी तो जेसीबीवर नव्हता. रात्रीच्या वेळी राजू नावाच्या एका व्यक्तीने हे जेसीबी मशीन रस्त्याच्या मधोमध उभे करुन रस्ता अडवला. यातून पोलिसांना अडवण्याचा हेतू होता. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपीचा मामा पोलिसांच्या कारवाईत मारला गेला.

विकास दुबेने सांगितलं, “चौबेपूर पोलीस ठाण्यासह आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आम्हाला मदत करणारे पोलीस कर्मचारी होते. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये आमची मदत केली होती. लॉकडाऊनच्या काळात चौबेपूर स्टेशनच्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांची मी भरपूर काळजी घेतली होती. सर्वांच्या खाणं-पिणं आणि इतर मदतीची व्यवस्था केली होती.”

हेही वाचा :

Vikas Dubey Arrested | गँगस्टर विकास दुबे याला अटक, उज्जैनमध्ये बेड्या

Statement of Kanpur Encounter Accuse Vikas Dubey

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.