बॉम्बस्फोट प्रकरणी वक्तव्य भोवले, मुख्यमंत्र्याच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची केंद्रीय मंत्र्यावर मोठी कारवाई

बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी केलेले वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच हे विधान केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांनी तक्रार केली होती.

बॉम्बस्फोट प्रकरणी वक्तव्य भोवले, मुख्यमंत्र्याच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची केंद्रीय मंत्र्यावर मोठी कारवाई
m k stalinImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 9:13 PM

बेंगळुरू | 20 मार्च 2024 : बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी वादग्रस्त विधान केल्यामुळे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे अडचणीत आल्या आहेत. रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाबाबत दावा करताना मंत्री शोभा करंदलाजे यांनी तामिळनाडूतील एका व्यक्तीने बॉम्ब पेरला होता असा दावा केला होता. त्यांच्या याच विधानावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत 48 तासांच्या आत कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला. त्यावरून केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केलेल्या दाव्याची चर्चा सुरु झाली होती. मंत्री शोभा करंदलाजे यांनी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब तामिळनाडूतील एका व्यक्तीने पेरला होता असा दावा केला होता. त्याचवेळी त्यांनी बेंगळुरूमध्ये अजान दरम्यान हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल एका व्यावसायिकाला मारहाण केल्याप्रकरणी सिद्धरामय्या सरकारवरही निशाणा साधला होता.

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी, ‘एक व्यक्ती तामिळनाडूतून आला. त्याने कॅफेमध्ये बॉम्ब ठेवला. दुसरे एक दिल्लीहून येतात विधानसभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देतात. तिसरा केरळमधून येतो आणि कॉलेज तरुणीवर ॲसिड ओततो. अशी टीका सिद्धरामय्या सरकारवर केली होती.

मंत्री शोभा करंदलाजे यांच्या याच विधानावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. एम. के. स्टॅलिन यांनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत, ‘मी भाजपच्या केंद्रीय मंत्री शोभा यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. असे दावे करण्यासाठी एकतर एनआयए अधिकारी असणे आवश्यक आहे किंवा रामेश्वरम कॅफे स्फोटाशी जवळचे संबंध असणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री यांना स्पष्टपणे असे दावे करण्याचा अधिकार नाही. तमिळ आणि कन्नड समाजातील लोक भाजपच्या या फुटीरतावादी वक्तव्याला नाकारतील.’ असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मंत्री शोभा करंदलाजे यांच्याविरोधातील तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली. शोभा करंदलाजे यांच्यावर 48 तासांच्या आत कारवाई करा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना दिले आहेत. मंत्री शोभा यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करा आणि त्याचा अहवाल 48 तासात केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवा, असे निर्देशही दिले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.