धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल

महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडत आहेत.(statistics of crimes against women in 2019 average 87 rape cases in a day)

धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना, बलात्काराच्या गुन्ह्यांत राजस्थान अव्वल
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 12:33 PM

दिल्ली : हाथरसमधील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडत असून महिला असुरक्षिततेच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागने (NCRB) दिली आहे. (statistics of crimes against women in 2019 given by NCRB)

देशात महिला अत्याचाराच्या घटनेत 7.3 टक्क्यांनी वाढ

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील वर्षी (2019) महिलांवरील अत्याचाराचे एकूण चार लाख पाच हजार गुन्हे नोंदवले गेले. यामध्ये दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना घडल्याची नोंद आहे. तर 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये महिला अत्याचाराच्या प्रमाणात तब्बल 7.3 टक्क्यांनी वाढ झाली. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर एक लाख महिलांमागे 117 महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. तसेच प्रतिलाख महिलांमागील अत्याचाराच्या घटनात आसाम सर्वात वरच्या स्थानावर आहे.

देशात सर्वाधिक गुन्हे हे भारतीय दंड संहितेअंतर्गत नोंदवले गेले. 30 टक्के गुन्ह्यांत महिलांवर घरच्या नातेवाईकांनीच लैंगिक अत्याचार केले. तर 21.8 टक्के गुन्ह्यांत महिलांवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. 17.9 गुन्ह्यांत महिलांचे अपहरण करण्यात आले. तर 7.9 टक्के महिलांवर बलात्कार झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची आकडेवारी सांगते.

बलात्काराच्या गुन्ह्यात राजस्थान सर्वात पुढे, सुशिक्षित केरळ दुसऱ्या स्थानावर राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या ताज्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या गुन्ह्यात राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे. राजस्थामध्ये एकूण 5997 बलात्काराचे गुन्हे घडले असून हे प्रमाण 15.9 टक्के आहे. तर 100 टक्के सुसिक्षित म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये प्रति 1 लाख महिलांमागे 11 महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसत आहे. महिला सामाजिक तिरस्कार, प्रतिष्ठेच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे महिला अत्याचारांचा हा आकडा यापेक्षाही मोठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक

(statistics of crimes against women in 2019 given by NCRB)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.