Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय , स्टीलच्या भावात 15% घसरणीचा अंदाज; स्वप्नातलं घर होणार साकार?

स्टील उत्पादनाच्या किंमतीत घसरण झाल्यास त्याचा थेट लाभ सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. स्टील उत्पादनांच्या किंमती घटल्यास बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय , स्टीलच्या भावात 15% घसरणीचा अंदाज; स्वप्नातलं घर होणार साकार?
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 10:04 PM

नवी दिल्लीः स्टील उत्पादनांच्या (STEEL PRODUCTS) दरवाढीचा आलेख घसरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने विविध स्टील उत्पादनांवरील विविध करांना कात्री लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. देशांतर्गत स्टील उत्पादनांच्या किंमतीत 10-15 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी वर्तविली आहे. स्टील उत्पादनांवर निर्यात शुल्काच्या (EXPORT DUTIES) आकारणीमुळे भाव घसरणीला चालना मिळणार आहे. तसेच दुय्यम स्टील उत्पादनांचे भाव 15 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन महेश देसाई यांनी व्यक्त केला आहे. बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या क्रेडाईने (CREDAI) सरकारच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. स्टील उत्पादनाच्या किंमतीत घसरण झाल्यास त्याचा थेट लाभ सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. स्टील उत्पादनांच्या किंमती घटल्यास बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उत्पादन खर्चात कपात

कोविड प्रकोपानंतर बांधकाम क्षेत्राच्या विकासाची चाकं मंदावली होती. स्टील व सिमेंटच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले होते. निर्मिती खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे देशांतर्गत उत्पादित स्टील उत्पादनांचे निर्मिती मूल्य कमी करण्यासाठी कोकिंग कोल आणि एन्थ्रेसाइटवरील आयात शुल्क थेट शून्य टक्क्यांवर आणण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. यासोबतच कोक आणि सेमी-कोकवरील आयात शुल्कात तब्बल पाच टक्क्यांची कपात करुन शून्य करण्यात आलं आहे. लोखंड आणि निकेलपासून निर्मित मिश्र धातूच्या फेरोनिकलवरील आयात शुल्क देखील 2.5 टक्क्यांनी घटवून शून्य करण्यात आलं

स्टील शेअर्स बंपर रिटर्न:

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर स्टील निर्देशांकात विक्रमी घसरण पाहायला मिळाली. जिंदल स्टील 18 टक्के, जिंदल स्टील हिस्सार 16 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 14 टक्के, एनएमडीसी 13 टक्के, टाटा स्टील 13 टक्के, सेल 11 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या दोन वर्षात स्टील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या गंगाजळीत मोठी भर पडली होती. गेल्या दोन वर्षात जेएसडब्ल्यू स्टील 280 टक्के, टाटा स्टील 325 टक्के, जिंदल स्टील अँड पॉवर 395 टक्के, सेल 204 टक्क्यांचा परतावा गुंतवणुकदारांना दिला होता.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.