देशातल्या सर्वात वेगवान ट्रेनवर पुन्हा एकदा दगडफेक
नवी दिल्ली : ट्रेन 18 वर पुन्हा एकदा ट्रायल रन दरम्यान दगडफेक करण्यात आली आहे. एक महिन्यामधील ट्रेनवर दगडफेक करण्याची ही दुसरी घटना आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 वाजता घडली. यावेळी ट्रेन दिल्ली पोहचण्यासाठी शकूरबस्ती स्टेशनवरुन पुढे आली होती. या घटनेत कोणी जखमी नसून, अजूनपर्यंत कोणाला अटक केली नाही, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवी […]
नवी दिल्ली : ट्रेन 18 वर पुन्हा एकदा ट्रायल रन दरम्यान दगडफेक करण्यात आली आहे. एक महिन्यामधील ट्रेनवर दगडफेक करण्याची ही दुसरी घटना आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 वाजता घडली. यावेळी ट्रेन दिल्ली पोहचण्यासाठी शकूरबस्ती स्टेशनवरुन पुढे आली होती. या घटनेत कोणी जखमी नसून, अजूनपर्यंत कोणाला अटक केली नाही, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला ट्रेन पोहचल्यावर सुरक्षा रक्षकांनी ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती दिली. ट्रेनच्या दुसऱ्या डब्याला दगड लागले आहेत. ट्रेन 18 मध्ये असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना या घडलेल्या घटनेची माहिती दिली. 188320 डब्यामध्ये खिडकीवर दगड लागला आहे. याआधी 20 डिसेंबर रोजी दिल्ली ते आगराच्या मध्ये ट्रायल रन दरम्यान ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती.
दगडफेक झाल्यानंतर ट्रेनच्या खीडकीचा फोटो
ट्रेन 18 वैशिष्ट्ये
या ट्रेनमध्ये उच्च दर्जाची सुविधा दिली जाईल. प्रत्येक सीटच्या मागे एलईडी स्क्रीन, वायफाय, जीपीएस, प्रत्येक डब्यात पँट्री, स्वयंचलीत दरवाजे असतील, जे स्टेशन आले तर स्वत:हून उघडतील आणि बंद होतील, ट्रेनमधील लाईटही स्वयंचलीत आहे. विशेष म्हणजे या ट्रेनचा स्पीड ताशी 180 किमी आहे. भारतातील सर्वात जलद ट्रेन म्हणून ट्रेन18 ची ओळखली जाते. ट्रेन 18 पूर्णपणे वातानूकलित आहे आणि अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत.