CBSE RESULT 12th 2019 : सीबीएसई परीक्षेत हंसिका आणि करिश्मा देशात अव्वल
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईचा निकाल जाहीर झाला. सीबीएसईने 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई निकालामध्ये तिरुअनंतपूरम (केरळ) पहिल्या क्रमांकावर आहे, चेन्नई (तामिळनाडू) दुसऱ्या क्रमांकावर आणि दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीबीएसईच्या सर्व विभागाचा निकाल आज एकाचवेळी जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई 12 वी परीक्षेत एकूण 83.4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले […]
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईचा निकाल जाहीर झाला. सीबीएसईने 12 वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई निकालामध्ये तिरुअनंतपूरम (केरळ) पहिल्या क्रमांकावर आहे, चेन्नई (तामिळनाडू) दुसऱ्या क्रमांकावर आणि दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीबीएसईच्या सर्व विभागाचा निकाल आज एकाचवेळी जाहीर करण्यात आला आहे.
सीबीएसई 12 वी परीक्षेत एकूण 83.4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक निकाल 98.2 टक्क्यांसह तिरुअनंतपूरम पहिल्या स्थानी आहे.
सीबीएसई परीक्षेत मुलींची बाजी
सीबीएसई बारावी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. DPS मेरठ, गाझियाबाद शाळेतील हंसिका शुक्ला आणि एसडी पब्लिक स्कूल मुझफ्फरनगरच्या करिश्मा अरोराने 499 गुणांसोबत देशात पहिला क्रमांक मिळवला. तर गौरांगी चावला (निर्मल आश्रम, दीप माला पब्लिक स्कूल, उत्तराखंड), ऐश्वर्या (केंद्रीय विद्यालय, रायबरेली) आणि भव्या (व्ही. आर. एस. के. इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, हरयाणा) या तिघींनी 498 गुणांसह देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
निकाल कसा पाहाल ?
सीबीएसईचा निकाल अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर पाहू शकता. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2019 साठी एकूण 31 लाख 14 हजार 831 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यामध्ये 12 वीसाठी 12 लाख 87 हजार 359 विद्यार्थी होते.