मुसळधार पावसामुळे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये अडकले, जेसीबीच्या मदतीने बाहरे काढले

| Updated on: Sep 29, 2019 | 9:16 AM

बिहारमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस (Student stuck in heavy rain) सुरु आहे. पाटणासह 16 जिल्ह्यातील रस्ते पाण्याने भरले आहेत.

मुसळधार पावसामुळे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये अडकले, जेसीबीच्या मदतीने बाहरे काढले
Follow us on

पाटणा : बिहारमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस (Student stuck in heavy rain) सुरु आहे. पाटणासह 16 जिल्ह्यातील रस्ते पाण्याने भरले आहेत. मुसळधार पावसामुळे (Student stuck in heavy rain) राजेंद्र नगरयेथील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये पाणी शिरल्याने अनेक मुली त्यात अडकल्या आहेत. एनडीआरएफच्या मदतीने त्या मुलींना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं आहे.

पाटणाच्या अनेक विभागात पाणी साचल्यामुळे हॉस्टेलमध्येही पाणी शिरलं होते. त्यामुळे तेथील मुलींना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. तिथे पाणी जास्त प्रमाणात होते. मुलींना बाहेर काढणेही कठीण होते. त्यामुळे मुलींना जेसीबीच्या लोडर बकेटमध्ये बसवून त्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढले. सर्व मुलींना सुखरुपपणे बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे.

मुसळधार पावसामुळे बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणि साचल्यामुळे रस्त्यांनाही नद्यांचे स्वरुप आलं आहे. यामुळे अनेकजण पाण्यात अडकले आहेत. यासाठी एनडीआरएफच्या दोन बोट राजेंद्र नगरमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहे.

पावसामुळे पाटणामधील वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. हॉस्पिटलमध्येही पाणी शिरल्याने रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे. बिहार सरकारकडूनही पाण्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान, हवामान खात्यानेही रविवारपर्यंत बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आजचा दिवसही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना घराबाहेर न पडण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.