हॉलिवूड कंपनीचा इरॉससोबत करार, बिग बजेट चित्रपटांची प्रेक्षकांना पर्वणी
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन ( Eros International and Hollywood's STX Entertainment merge) करण्यात आले आहे.
मुंबई : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन ( Eros International and Hollywood’s STX Entertainment merge) करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपटसृष्टी थांबलेली असताना आता चित्रपट निर्मितीसाठी हॉलिवूड आणि बॉलिवूड कंपन्या एकत्र येणार आहे. इरॉस इंटरनॅशनल या भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट बनवणाऱ्या कंपनीने ‘एस. टी. एक्स एन्टरटेन्मेट’ या हॉलिवूड कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात या दोन्ही कंपन्या बिग बजेट चित्रपटांची निर्मिती करणार आहेत.
इरॉस इंटरनॅशनल या भारतातील चित्रपट कंपन्यांनी ‘एस. टी. एक्स एन्टरटेन्मेट’ या हॉलिवूड कंपनीसोबत 550 मिलीयन डॉलरचा करार केला आहे. या करारानुसार येत्या काळात या दोन्ही कंपन्या अनेक बिग बजेट चित्रपट, ग्लोबल इंटरटेनमेंट कटेंट, डिजीटल मीडिया आणि ओटीटी शो यांची निर्मिती करणार आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपट रसिकांना येत्या काळात अनेक चांगले चित्रपट पाहण्याची पर्वणी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान इरॉस इंटरनॅशनल या चित्रपट कंपनीने आतापर्यंत थ्री इडियट्स, बजरंगी भाईजान, बाजीराव मस्तानी, बदलापूर यासारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
तर ‘एस. टी. एक्स एन्टरटेन्मेट’ ही हॉलिवूड कंपनी आहे. या कंपनीने ‘द फॉरेनर’, ‘द बॉय’, ‘माईल २२’, ‘अग्ली डॉल्स’ यांसारखे बिज बजेट सुपरहिट चित्रपट केले आहेत.