एकीकडे वडील निवृत्त, दुसरीकडे मुलगी UPSC पास, ज्ञानेश्वर मुळेंच्या लेकीचं यश

पुणे : माजी परराष्ट्र सचिव आणि लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्या मुलीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवले आहे. पूजा मुळे हिने 11 वा क्रमांक पटकावत हे यश संपादन केले. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर मुळे 3 महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले आहेत. ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून प्रभावीपणे काम पाहिले […]

एकीकडे वडील निवृत्त, दुसरीकडे मुलगी UPSC पास, ज्ञानेश्वर मुळेंच्या लेकीचं यश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

पुणे : माजी परराष्ट्र सचिव आणि लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्या मुलीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवले आहे. पूजा मुळे हिने 11 वा क्रमांक पटकावत हे यश संपादन केले. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर मुळे 3 महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले आहेत.

ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे. निवृत्त होताना ते भारतीय परराष्ट्र खात्यात सचिव पदावर कार्यरत होते. पूजाची आई साधना शंकर याही दिल्लीच्या मुख्य आयकर आयुक्त म्हणून काम करतात.

पूजाचे सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्ली येथे झाले. 26 वर्षीय पूजाने दिल्ली येथे पदवी घेतल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून समाज व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पूजाला सुरुवातीपासूनच वडिलांचे काम पाहिल्याने परराष्ट्र सेवेत जाण्याची इच्छा होती. अखेर तिने 11 वा क्रमांक मिळवत आपले परराष्ट्र सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिला तिसऱ्या प्रयत्नामध्ये हे यश आले.

आपल्या जन्मदिनाच्या दिवशीच मोठी भेट

योगायोग म्हणजे शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला, त्याच दिवशी पूजाचा जन्मदिनही होता. त्यामुळे या निकालाने पूजाला जन्मदिनाची मोठी भेट मिळाली असून तिच्या आनंदात मोठी भर घातली. वडील निवृत्त झाल्यावर काही दिवसातच मुलीने वडिलांच्या विभागातच यश संपादन केल्याने मुळे कुटुंबीयांनीही मुलीचे अभिनंदन करताना तिच्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ:

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.