अहमदनगरमध्ये पिता-पुत्राची आत्महत्या, मुलाने गळफास घेतल्याचं पाहताच वडिलांनीही जीवन संपवलं
जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Suicide of Son and Father in Ahmednagar).
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्येच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Suicide of Son and Father in Ahmednagar). मुलाने राहत्या घरी रात्री बारा वाजेच्या सुमारास पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. यानंतर मुलाने आत्महत्या केल्याचे पाहताच वडिलांनी देखील पहाटे 5 वाजेच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी येथे ही घटना घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर परिसरात संजीवनी येथे काल (शुक्रवारी, 3 जुलै) रात्री पिता-पुत्रांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50 )अशी मृतांची नावे आहेत.
राहुल हा एका शिक्षण संस्थेत लेक्चरर असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच संजय फडे हे मेस चालवत होते. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरातील कुरबुरीमुळे बापलेकाने आत्महत्या केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मात्र, या आत्महत्येंमागील खरं कारण पोलीस तपासातच पुढे येईल. पोलिसांनी देखील या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा :
लॉकडाऊनचा फटका, पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर
Mumbai Child Murder | घरगुती भांडणाचा राग, चार वर्षांच्या चिमुकल्याला मामीने बालदीत बुडवून मारलं!
नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस, मित्राच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला
Suicide of Son and Father in Ahmednagar