Kim Jong-Un | उत्तर कोरियाच्या सुल्तानचा मास्क सक्तीचा फर्मान, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट सक्तमजुरी
उत्तर कोरिया इतर देशांप्रमाणे फक्त फर्मान काढून मोकळा झालाय असंही नाही. तर लोक प्रत्यक्षात मास्क घालत आहेत की नाही, यावर नजर ठेवण्यासाठीच स्वतंत्र तुकड्या नियुक्त केल्या आहेत.
मुंबई : उत्तर कोरियाचा बेलगाम, क्रृर आणि सनकी सुल्तान (Kim Jong-Un Announced Mask Compulsion), ज्याने स्वतःचा अर्ध्याहून अधिक देश दारुगोळ्याच्या फॅक्टरीत रुपांतरीत केला. ज्याला टक्कर देण्यासाठी सुपरपॉवर अमेरिका सुद्धा 4 वेळा विचार करते. मात्र, सध्या त्याच किम जोंगचा कोरोना व्हायरसनं थरकाप उडाला आहे (Kim Jong-Un Announced Mask Compulsion).
उत्तर कोरियाचाच जिगरी दोस्त चीनच्या कोरोनामुळे सध्या उत्तर कोरियात दहशत आहे. त्यामुळे किम जोंगने स्वतःच्या देशात पहिल्यांदाच मास्कच्या सक्तीचं फर्मान काढलं. युरोप आणि आफ्रिकन देशांमध्ये सुद्धा मास्क घालणं बंधनकारक आहे. मात्र, मास्क नसेल तर या दोन्ही खंडामध्ये फार-फार आर्थिक दंडाची तरतूद केली गेली आहे. पण हुकुमशहा किम जोंगला दंडासारख्या कागदी शिक्षा कधी मानवतच नाहीत. म्हणून उत्तर कोरियात मास्क न घालणाऱ्याला थेट सक्तमजुरीची शिक्षा दिली जाणार असल्याचं जाहीर केलं गेलं.
उत्तर कोरिया इतर देशांप्रमाणे फक्त फर्मान काढून मोकळा झालाय असंही नाही. तर लोक प्रत्यक्षात मास्क घालत आहेत की नाही, यावर नजर ठेवण्यासाठीच स्वतंत्र तुकड्या नियुक्त केल्या आहेत. या तुकड्यांना वेगवेगळ्या शहरात गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांवर नजर ठेवण्याचं काम दिलं गेलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत उत्तर कोरियात एकही कोरोनाचा रुग्ण सापडल्याची नोंद नाही. पण, किम जोंगच्या सरकारवर सुरुवातीपासून माहिती लपवल्याचा आरोप होतो आहे. कारण, उत्तर कोरिया चीनच्या सीमेला लागून असलेलं एक हुकुमशाही राष्ट्र आहे. उत्तर कोरिया आणि चीनमध्ये तब्बल 1400 किलोमीटरची सीमा सुद्धा आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोरिया हे उत्तर कोरियाच्या पल्याड असल्यामुळे दक्षिण कोरिया आणि चीनच्या सीमा लागून नाही. तरी सुद्धा दक्षिण कोरियात 14 हजार रुग्ण आहेत आणि उत्तर कोरियात मात्र एकही रुग्ण नाही (Kim Jong-Un Announced Mask Compulsion).
मात्र, असं असलं तरी कोरोनाचा फैलावाच्या 7 महिन्यानंतर उत्तर कोरियात पहिल्यांदाच मास्कची सक्ती आणि रुग्ण सापडले. तर त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटरसुद्धा उभारले गेले आहेत. सुरुवातीच्या काळात उत्तर कोरियात कोरोनाचे रुग्ण सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, उत्तर कोरियाने त्या फेटाळून लावल्या. त्यानंतर खुद्द किम जोंग दोन आठवडे गायब झाला. तेव्हा सुद्धा किम जोंगलाच कोरोना झाल्याची चर्चा होती. कारण, किम जोंग स्वतः चेनस्मोकर आहे. म्हणून त्याला विलग केलं गेल्याचं बोललं गेलं.
त्या दोन आठवड्यांच्या काळात किम जोंगची बहिण किम यो जाँग उत्तर कोरियाचा कारभार पाहत होती. मात्र, किम जोंग परतल्यानंतर आता उत्तर कोरियात कोरोनासाठी निर्बंध घातले जात आहेत. सर्वात उशिराने मास्कची सक्ती करणारा उत्तर कोरिया हा जगातला एकमेव देश आहे.
उत्तर कोरियात जर समजा खरोखर रुग्ण असतील, तर किम जोंग त्याचा जगाला सुगावा सुद्धा लागू देणार नाही. कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये डुलकी लागली म्हणून याच किम जोंगने थेट संरक्षणमंत्र्यालाच तोफेच्या तोंडी दिलं होतं. त्यामुळे तिथं मास्क न घालणाऱ्यांचे काय हाल होतील, याची कल्पनाच न केलेलं बरं.
चीनविरोधात 9 देशांची एकजूट, अमेरिकेची आक्रमकता, युद्धाचे संकेत?https://t.co/tNiX91ytxY #China #India
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2020
Kim Jong-Un Announced Mask Compulsion
संबंधित बातम्या :