Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक, अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित

आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार यांच्यात नुकतीच बैठक पार पडली. Aaditya Thackeray meeting with CP Param Bir Singh

आदित्य ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक, अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित
Akshay Kumar_Aaditya Thackeray_Param Bir Singh meeting sushant singh rajput case
Follow us
| Updated on: Aug 01, 2020 | 6:40 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजप नेते याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांऐवजी CBI कडे देण्याची मागणी करत असताना, तिकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बैठक झाली. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला अभिनेता अक्षयकुमारही उपस्थित होता.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. जवळपास तासभर ही बैठक चालली. या बैठकीची एक्स्क्लुझिव्ह दृश्ये टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली. (Aaditya Thackeray meeting with CP Param Bir Singh)

अक्षय कुमारने पोलीस कर्मचाऱ्यांना घड्याळे भेट देण्यासाठी, आदित्य ठाकरे आणि पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत जवळपास 1 तास बैठक झाली. पण सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या गाजते आहे. भाजपचे नेते या प्रकरणाच्या CBI चौकशी मागणी करताना, या प्रकरणाचा महाविकास आघाडी सरकारमधील मुंबईत राहणाऱ्या एका युवा मंत्र्यांचा संबंध जोडत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर तपासकार्यात दबाव असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केलाय.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशी मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि परमवीर सिंह-अक्षय कुमार यांच्यातील बैठकीला महत्त्व आहे. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबतच्या तपशीलाकडे सर्वांचं लक्ष आहे.

(Aaditya Thackeray meeting with CP Param Bir Singh)

देवेंद्र फडणवीसांची मागणी

“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी अनेकांची मागणी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वागणुकीकडे बघितल्यावर तसं होणार नाही. पण याप्रकरणी ईडीने तरी ईसीआयआर दाखल करुन मनी लॉन्ड्रिंग आणि मनी ट्रेलिंगबाबत चौकशी करावी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात रियाकडून खंडणीचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत रियाने खुलासा केला आहे.

“माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माझ्याबद्दल प्रसारमाध्यमात खूप वाईट गोष्टी बोलल्या जात आहे. पण माझ्या वकीलांनी मला याबाबत भाष्य करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, सत्यमेव जयते!” असे या व्हिडीओत रियाने म्हटलं आहे.

ईडी चौकशी करणार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करणार आहे. याप्रकरणी ईडीने इन्फोर्समेंट केस रिपोर्ट नोंदवला आहे. ईडी आता सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी करणार आहे. सुशांतचे बँक खात्याचे सर्व डिटेल्स तपासले जातील. आर्थिक व्यवहार काय आणि कसे झाले, याची चौकशी होणार आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

ईडी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे. ईडीने याबाबत बिहार पोलिसांना सूचान दिल्या आहेत. याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करावी, अशी सूचना ईडीकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी, सुशांत प्रकरणात नव्या घडामोडी, रियाचा खंडणीबाबतचा व्हिडीओ व्हायरल

Sushant Singh Rajput Suicide | माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सत्यमेव जयते, रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया  

Sushant Singh Rajput | रियाची सुशांतवर काळी जादू, सुशांतच्या बहिणीचे गंभीर आरोप 

निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.