Sushant Singh Rajput Ashes immersion | नावेतून गंगा नदी पार, सुशांतसिंह राजपूतच्या अस्थीचं कुटुंबियांकडून विसर्जन
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)
पाटणा : गंगा नदीत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे अस्थीविसर्जन करुन अखेरचा निरोप देण्यात आला. पाटण्यात सुशांतचे वडील, बहीण, भावोजीसह काही नातेवाईकांनी नदी पार करुन अस्थीकलश विसर्जित केला. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)
सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील बिहारहून मुंबईत आले होते. सुशांतच्या पार्थिवावर 15 जूनला मुंबईतील विले पार्लेत पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी त्याची बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते.
Bihar: Family of actor #SushantSinghRajput immersed his ashes in river Ganga in Patna today. He died by suicide at his residence in Mumbai’s Bandra on June 14. pic.twitter.com/Heo6wrrJIQ
— ANI (@ANI) June 18, 2020
कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात वरुणराजानेही हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अभिनेते विवेक ओबेरॉय, रणवीर शौरी यासारखे मोजके कलाकार वगळता मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली नाही.
हेही वाचा : सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान, एकता, करण, भन्साळीविरोधात तक्रार
सुशांतने रविवार 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. (Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)
मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. वांद्रे पोलीस आज सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवत आहेत. रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झाली.
रिया ही सुशांतची मैत्रीण आहे. सुशांत तिच्या संपर्कात होता. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलीस तिच्याकडे विचारणा करु शकतात.
त्याआधी पोलिसांनी काल कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा.
सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली.
संबंधित बातम्या
Sushant Singh Rajput suicide investigation | रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये
(Sushant Singh Rajput Ashes immersion Submerging after funeral)